मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय गणिती (गणितज्ञ) - भाग ३

आज आपल्याला भारतिय गणितज्ञ म्हणले कि काहि विषेश प्रसिध्द असणारे नावेच आठवतात उदा. भास्कराचार्य, ब्रम्हगुप्त ई.. पण काय भारतात फक्त तेवढेच गणितज्ञ होऊन गेले आहेत का? नक्कीच नाही. जितके प्रसिध्द गणिती आहेत आपल्याला फक्त तेवढ्यांचिंच नावे माहित आहेत. पण गणित इतिहासातल्या बहुतेक गणितींची नावे तर काळाच्या पडद्याआड गेले आहेत त्यातुनहि ज्या कमी - अधिक प्रसिध्द गणितींचा उल्लेख या प्रसिध्द गणितींच्या ग्रंथांमध्ये आढळतो त्यांच्या बद्दल आपल्याला खुप कमी माहिती आहे. अशा गणितींचा सुध्दा कुठेतरी उल्लेख व्हायला हवा आपल्याला त्यांच्याबद्दल सुध्दा माहिती असायला हवी म्हणूनच आजची हि पोस्ट.. लाटदेव :- यांनी प्राचीन रोमक सिध्दांतांवरच चर्चा करणारे ग्रंथ लिहिले. यांना प्राचीन भारतीय गणिताचा ग्रीक गणित वगैरेंशी असलेला संबंध जगापुढे आणायचा होता असे मानले जाते. नि:शंक :- यांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकि कुठलाही ग्रंथ आज उपलब्ध नाही. हे स्वतः जुने लिखाण पडताळून (तपासून) पाहत असल्यामुळे यांच्या मतांना त्यांच्या नंतरच्या गणितींनी खुप किंमत दिली यांचे यांच्या नंतरच्या गणितज्ञांच्या ग्रंथात अनेकवेळा आलेले आहे. याने

माऊली - संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर (Sant Dnyaneshwar)           "ज्ञानेश्वर माऊली" अवघ्या महाराष्ट्राला भावार्थदिपिकेच (ज्ञानेश्वरीचेच आणखी एक नाव) ज्ञान देणारे संत.  वडिल विठ्ठलपंत कुलकर्णी मुळातच विरक्त, लग्नानंतर त्यांनी सन्यास घेतला व काशीला निघून गेले. ज्यावेळी विठ्ठलपंतांच्या गुरुंना ते विवाहित असल्याचे समजले त्यावेळी त्यांनी विठ्ठलपंतांना परत घरी जाण्याचा आदेश दिला. विठ्ठलपंतांनी सुध्दा गुरुआदेशामुळे गृहस्थाश्रमात पुन्हा प्रवेश केला. त्यांना निवृत्ती (जन्म १२६८ किंवा १२७३), ज्ञानेश्वर (जन्म १२७१ किंवा १२७५), सोपान (जन्म यांच्या जन्मकाळ लक्षात आला नाहि पण ज्ञानेश्वरांपेक्षा २-३ वर्षांने लहान म्हणजेच १२७४ किंवा १२७८ च्या सुमारास झाला असावा), मुक्ताबाई (जन्म १२७९ ) अशी चार अपत्ये झाली.            विठ्ठलपंत तीर्थयात्रे निमित्त आळंदी येथे आले व तीथेच स्थायिक झाले. सन्यासामधुन परत येऊन गृहस्थाश्रमी प्रवेश केलेला असल्यामुळे विठ्ठलपंतांच्या परिवाराला समाजाने वाळीत टाकले. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज सुध्दा नाकारण्यात आली. यावर उपाय काय म्हणुन विठ्ठलपंतांनी तत्कालीन प्रतिष्ठित ब्

भारतीय गणिती (गणितज्ञ) - वराहमिहिर आणि ब्रम्हगुप्त

आज आपण आणखीन दोन महान गणितज्ञा बद्दल जाणून घेणार आहोत. १) वराहमिहिर (varahmihir marathi), २) ब्रम्हगुप्त (brahmagupta marathi) वराहमिहिर (Varahmihira)  :-          अंतराळात पृथ्वी कुठल्याही आधाराविना एका आकर्षण शक्तिच्या जोरावर अधांतरी आहे व तीच आकर्षण शक्ति सर्व वस्तूंना पृथ्वीवर धारण (धरुन ठेवते) करते हे सांगणारा पहिला गणिती. पण आर्यभट्टाच्या द्वेषाने म्हणा किंवा ईतर काही कारणाने म्हणा त्यांनी आर्यभट्ट ने सांगितलेला नियम (पृथ्वी स्वतः भोवती परीक्रमा करते व सोबतच सुर्याभोवतीहि परीक्रमा करते) मान्य केला नाही उलट या नियमाची हेटाळणीच केली. जर वराहमिहिर यांनी व्यक्तिगत स्पर्धा सोडून आर्यभट्टाच्या या नियमाला मान्य केले असते व या नियमाची सांगड स्वतः शोधलेल्या आकर्षणाच्या शक्तीच्या नियमाशि घातली असती तर कदाचित आज न्यूटन च्या जागी गुरुत्वाकर्षणाचा शोध वराहमिहिर यांच्या नावावर असता.          वराहमिहिर यांचा जन्म ४९० साली व मृत्यु ५८७ साली झाला. यांचे चे जन्मस्थल अवंती मानले जायचे पण ते चुकिचे आहे. यांच्या वडिलांचे नाव आदित्यदास असल्यामुळे वराहमिहिरांना सुर्याचे वरदान प्राप्त आहे असा

शेरलॉक होम्स च्या रहस्य कथा

       मी शेरलॉक होम्स च्या रहस्य कथा एकत्र करण्यासाठी ही पोस्ट करत आहे. या कथा वाचण्यासाठी काही दिवसांपासून internet वर शोधत आहे. पण मला त्या एकत्रपणे मिळाल्या नाहीत अशीच अडचण तुम्हाला असेल तर माझी ही पोस्ट तुमच्यासाठीच आहे.        शेरलॉक होम्स हे एक अस नाव आहे जे माहित नसणारा वाचक मिळण जगातील कुठल्याही प्रगतशील वाचकवर्ग असणाऱ्या देशात महाकठीण बाब म्हणावी लागेल. शेरलॉक होम्स च्या रहस्य कथेंचा वाचकवर्ग खुप मोठा आहे. आजही गुप्तहेर कथा म्हणजे डॉयल यांच्या शेरलॉक होम्स कथा हे समीकरण झालेल आहे. जगातल्या सगळ्यात जास्त वाचल्या जाणाऱ्या रहस्य कथा संग्रहांपैकी हा एक महत्वाचा कथा संग्रह आहे.        साधारणपणे कुठलीही रहस्य कथा एकदाच वाचावी वाटते कारण रहस्य कथेचे रहस्य माहीती पडल्यावर त्यातली गोडी निघून जाते पण या कथा संग्रहातील सगळ्या कथा या गोष्टीला अपवाद ठरतात. शेरलॉक होम्स ची एखादी कथा वाचायला घेतली की ती पुर्ण होऊपर्यंत पुस्तक बंद करावसं वाटतं नाही.        सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या लेखणीतून अवतरलेल्या या मानसपुत्राने १२० वर्षापेक्षा जास्त काळापासून वाचकांना अगदी वेड लावले आहे अस

वैदिक गणित आणि समज - गैरसमज

       आपल्यापैकी बर्‍याच लोकांनी वैदिक गणिताबद्दल काही ना काही नक्कीच ऐकल असेल. या विषयावर वेगवेगळ्या भाषांमध्ये अनेक पुस्तके, ब्लॉग लिहिले जात आहेत. गणित सोडवण्याची जादुई पद्धत वगैरे वगैरे.. असा गौरव भरपूर लोक करत आहेत.        येता जाता आपण अनेक ठिकाणी वैदिक गणिताचे वर्ग, सेमिनार या बद्दल वाचत किंवा ऐकत असाल. या सगळ्या गोष्टीमुळे आपल्यापैकी बहुतेकांना या बद्दल काही प्रश्न पडले असतील. तर चला जाणुन घेवुयात वैदिक गणित विषया संबंधित शंका- कुशंका...! वैदिक गणित काय आहे?        हा एक सूत्रसंग्रह आहे ज्याची रचना कींवा संशोधन गोवर्धन पीठाचे शंकराचार्य श्री. भारतीकृष्ण महाराज यांनी केली.        आपण सर्वांनी शाळेत ऐकलच असेल की, कोणतेही गणित अनेक पध्दतीने सोडवता येते त्यातलिच वैदिक गणित ही सुध्दा एक सोपी पध्दत आहे असं आपल्याला म्हणता येईल.        वैदिक गणितात एकुण २९ (१६ मुख्य सूत्रे व १३ उपसूत्रे) लहान लहान सूत्र आहेत. प्रत्येक सूत्र अनेक प्रकारचे गणिते सोडवण्यासाठी वापरता येते. वैदिक गणितामुळे गणित खरच सोप होत का?        तर या प्रश्नाचे सरळ सरळ उत्तर हो.. असे देता येईल. यातल्या

चाणक्य - ओळख एका कादंबरीची

     'चाणक्य' या आनंद साधले यांनी लिहिलेल्या कादंबरीचे मुळ कथानक हे विशाखादत्त यांच्या मुद्राराक्षस या नाटकावर आधारित आहे. त्यामुळे त्या कथेचा क्रमही मुद्राराक्षस प्रमाणेच असून त्यात विष्णुगुप्त चाणक्य यांची व्यक्तिरेखा, त्यांची राष्ट्रभक्ती व देशाच्या हितासाठी केलेले कुटील राजकारण तसेच चंद्रगुप्त वरील प्रेम यांचे दर्शन होते.        कादंबरी मध्ये चाणक्यांच्या व्यक्तिरेखेचं वर्णन करताना लेखक शिव शंकरांची उपमा देतात. आणि त्याचप्रमाणे चाणक्यांच्या चारीत्र्यात संतापाचे व प्रेमाचे वर्णन दिसते.       कथेची सुरुवात विष्णुगुप्त महापद्म राजाच्या दरबारी जातो व तिथे त्याचा अपमान झाल्याने संपुर्ण नंदवंशाला नष्ट करण्याची शपथ घेतो इथून होते. चाणक्यांच्या ज्ञान व विद्वत्ता यावर भक्ति बसल्याने आणी मुलाच्या जीवाला राजमहालात धोका असल्याने तसेच चाणक्य आपल्या मुलाचे भवितव्य घडवतील या आशेने मुरा चाणक्यांच्या परतीच्या वाटेवर त्यांना भेटून चंद्रगुप्तचा सांभाळ करावा अशी विनंती करते, चाणक्यही ते मुल नंदवंशातिल नाही याची खातरजमा करून त्या मुलाला सांभाळतात. चाणक्यांनासुध्दा त्यांच्या प्रतिज्ञा पुर्तिस