भारत आणि गणित हे असे दोन विषय आहेत की ज्यातल्या एकाच्या महानतेची कहानी सांगायची झाल्यास दुसर्याचा उल्लेख केल्याशिवाय ती पुर्ण होणार नाही. तर मग भारताने गणितात जगाला असे काय योगदान दिले आहे की की भारताच नाव गणित इतिहासाशी जोडले जाते?
तस पाहिल तर भारतात अनेक महान गणितज्ञ होऊन गेले. पण कोण होते ते? त्यांनी असे कुठले शोध लावले की गणित इतिहासात त्यांचे नाव अमर झाले? तुम्हाला सुद्धा असेच प्रश्न पडलेत? तर चला या सगळ्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे शोधुयात.प्रत्येक गणितीच (गणितज्ञाच) कार्य इतकं महत्वाचे आहे की सगळ्याच नाव आणि माहिती सांगणे गरजेचे आहे पण मला माहिती व जागे अभावि सध्या अवघड आहे.
सुरुवात कुठून करावी? .... आज आपण कुणालाही (गणिता संदर्भात) खुप शहाणा समजतोस का? असा टोमणा मारायचा झाला तर आपण सहजपणे त्याला स्वतःला काय आर्यभट्ट समजतोस का? असे म्हणतो. भारताच्या प्रथम उपग्रहाचे नाव सुध्दा याच गणितज्ञाची आठवण म्हणून आर्यभट्ट ठेवण्यात आले. ठिक आहे तर मग सुरवात आर्यभट्ट प्रथम (aryabhatta pratham) पासूनच करुयात..

![]() |
आर्यभट्ट प्रथम |
आर्यभट्ट (aryabhatta):-
पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते व सोबतच सुर्याभोवतीही फिरते. हे सगळ्यांना सांगणारा पहिला गणिती.
आर्यभट्टाचा जन्म इ. स. ४७६ साली झाला असे वर्णन आर्यभट्टीय नावाच्या ग्रंथांत उल्लेख मिळतो. जन्मस्थळाचा उल्लेख सुध्दा कुसुमपुर असा मिळतो पण हे कुसुमपुर नेमके कुठले? हे आजही स्पष्ट नाही.
एखादा शोध जर सामान्य माणसाला कळावा असा सांगायचा असेल तर एखाद उदाहरण देऊनच सांगाव लागतो. आर्यभट्टाने सुध्दा पृथ्वी फिरत आहे आहे हा शोध खुप गमतीशीर उदाहरण देउन सांगितला. खुप प्रसिद्ध उदाहरण आहे हे कदाचीत तुम्ही ऐकलच असेल.
नदीच्या विशाल पात्रातून नावेत बसुन चालल्यावर नदिच्या आजूबाजूचे झाडे, घरे इतकेच काय अगदी डोंगर ज्या प्रमाणे आपल्याला उलट दिशेने पळताना दिसतात पण प्रत्यक्षात ते झाडे, घरे व डोगर स्थिर असतात तसच आपल्याला रोज सुर्य पुर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो पण सुर्य स्थिर असुन पृथ्वी त्याभोवती फिरते!

अक्षरांक पध्दत :-
"ज्या पध्दतीत एखादी संख्या लिहण्यासाठी अंकाऐवजी अक्षरे वापरली जातात त्या पध्दतीला अक्षरांक पध्दत म्हणतात."
"ज्या पध्दतीत एखादी संख्या लिहण्यासाठी अंकाऐवजी अक्षरे वापरली जातात त्या पध्दतीला अक्षरांक पध्दत म्हणतात."
आर्यभट्टाच्या अगोदर पासुनच भारतात अनेक अंकासाठी अक्षरांचा कींवा शब्दांचा वापर करण्याची प्रथा होती. मग आता तुम्ही म्हणाल की जर आर्यभट्टाच्या अगोदर पासूनच अक्षरांक पध्दत भारतात अस्तित्वात होती तर ईथे त्याचा उल्लेख करण्याच काय कारण? कारण, अक्षरांक पध्दत आर्यभट्टाआगोदर अस्तित्वात असली तरी ती विस्कळीत रुपात होती प्रत्येक अंक त्या पध्दतीला अनुसरून लिहिता येत नव्हता पण आर्यभट्टाने त्या सगळ्या पध्दतीचा अभ्यास करुन स्वतःची एक व्यवस्थित अशी पध्दत तयार केली त्या पध्दतीसाठी नियमावली तयार केली.. इतकच काय तर या पध्दतीचा स्वतः च्या आर्यभट्टिय या ग्रंथात वापर पण करुन दाखवला. आर्यभट्टाचि अक्षरांक पध्दत त्याच्या ग्रंथांशिवाय दुसरीकडे कुठेही वापरली गेली नाही.
आर्यभट्टिय या ग्रंथात अंकगणित, बीजगणित व भूमिती सुध्दा आहे.
आर्यभट्टला अंक पध्दती कींवा दशमात पध्दत माहीत नव्हती का.?
आर्यभट्टिय मध्ये अक्षरांक पध्दतींचा वापर केल्यामुळे अनेकांना असा प्रश्न पडला असेल की आर्यभट्टला अंक पध्दत कींवा दशमान पध्दत माहिती नव्हती का? अस मुळीच नाही. आर्यभट्टला दशमान पध्दत माहीत होती. मग अक्षरांक पध्दत निर्माण करण्याच कारण काय? कारण आर्यभट्टाच्या काळात कुठल्याही प्रकारचे छापखाने अस्तित्वात नव्हते. त्यावेळी ज्ञान, माहिती लक्षात ठेवण्यासाठी पाठांतराचा आधार घेतला जाई, आपल्याला माहित असेलच अंक लक्षात ठेवणे किती अवघड आहे. हीच अडचण सोडवण्यासाठी अक्षरांक पध्दत जन्माला आली असे म्हटले तर चूकिचे ठरणार नाही..

लोकांना ते गणिते लक्षात ठेवण सोप जावे म्हणून आर्यभट्टाने अनेक गणिती सूत्रे अंक यांना अक्षरांक पध्दतीच्या मदतीने छंदोबद्ध (कवितेत) पध्दतीत रचले. याच निमित्ताने आर्यभट्ट यांच्या काव्य करण्याच्या प्रतिभेच दर्शन सगळ्यांना झाले.
ज्या काळात अनेक पश्चिमेकडील देशात ज्ञान - विज्ञानाचे शोध लावणार्या शास्त्रज्ञांना शिक्षा केली जायची त्याच काळात भारतात आर्यभट्ट सारख्या गणितीचे कौतुक केले जाई.
आर्यभट्ट च्या रुपाने कुसुमपुरात स्वतः सुर्य अवतरला असा गौरव तत्कालीन कविने केला.
भारतात पाचव्या शतकात आर्यभट्ट सारखे गणिती नावारूपाला येतात इतकेच काय सामान्य जनता त्यांच्या ग्रंथांबद्दल त्यांचे कौतुक करते अशा देशाची तत्कालीन शिक्षण व्यवस्था ही बर्यापैकी विकसित आणि जन - माणसात पोहचलेली व रुजलेली असणार.! कारण तसे नसते तर कदाचित आर्यभट्टाला सुर्याची उपमा देण्यापेक्षा तत्कालीन जनतेने म्हणा किंवा शासन व्यवस्थेने म्हणा एखाद्या प्रकारची शिक्षा देणे जास्त पसंत केले असते.
ग्रंथ :-
१) आर्यभट्टिय
२) तंत्र
१) आर्यभट्टिय
२) तंत्र
भारतात ज्या पद्धतीने गणितावर संशोधन झाले त्याचप्रमाणे आणखी एक क्षेत्र आहे ज्यावर भारतात खुप मोठ्या प्रमाणावर संशोधन झाले, आणि ते क्षेत्र म्हणजे योग विज्ञान ज्यामधला एक विषय म्हणजे ध्यान. मी माझ्या ध्यान प्रवासा बद्द्ल व्यक्त मन भाग २ ध्यान हि पोस्ट केली आहे जी तुम्हाला वाचायला नक्कीच आवडेल.
मला आशा आहे की तुम्हाला माझि ही पोस्ट नक्कीच आवडली असेल. तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली? ही पोस्ट आवडली असल्यास किंवा माझ्या पोस्ट मधे जर काही चुकले असेल तर तर कृपया comment नक्की करा.
आपल्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत....!
आपल्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत....!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा