मुख्य सामग्रीवर वगळा

भारतीय गणिती (गणितज्ञ) - भाग ३

आज आपल्याला भारतिय गणितज्ञ म्हणले कि काहि विषेश प्रसिध्द असणारे नावेच आठवतात उदा. भास्कराचार्य, ब्रम्हगुप्त ई.. पण काय भारतात फक्त तेवढेच गणितज्ञ होऊन गेले आहेत का? नक्कीच नाही. जितके प्रसिध्द गणिती आहेत आपल्याला फक्त तेवढ्यांचिंच नावे माहित आहेत. पण गणित इतिहासातल्या बहुतेक गणितींची नावे तर काळाच्या पडद्याआड गेले आहेत त्यातुनहि ज्या कमी - अधिक प्रसिध्द गणितींचा उल्लेख या प्रसिध्द गणितींच्या ग्रंथांमध्ये आढळतो त्यांच्या बद्दल आपल्याला खुप कमी माहिती आहे. अशा गणितींचा सुध्दा कुठेतरी उल्लेख व्हायला हवा आपल्याला त्यांच्याबद्दल सुध्दा माहिती असायला हवी म्हणूनच आजची हि पोस्ट..

लाटदेव :-
यांनी प्राचीन रोमक सिध्दांतांवरच चर्चा करणारे ग्रंथ लिहिले. यांना प्राचीन भारतीय गणिताचा ग्रीक गणित वगैरेंशी असलेला संबंध जगापुढे आणायचा होता असे मानले जाते.

नि:शंक :-
यांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकि कुठलाही ग्रंथ आज उपलब्ध नाही. हे स्वतः जुने लिखाण पडताळून (तपासून) पाहत असल्यामुळे यांच्या मतांना त्यांच्या नंतरच्या गणितींनी खुप किंमत दिली यांचे यांच्या नंतरच्या गणितज्ञांच्या ग्रंथात अनेकवेळा आलेले आहे. याने आर्यभट्टिय ग्रंथावर भरपुर टिका लिहिली होती असे म्हणतात.

विजयनंदिन :-
यांनी पुराण ग्रंथांचा खुप मोठा संग्रह केला होता असे म्हणतात. यांनी बरेच जुने ग्रंथ परत साध्या भाषेत लिहिले होते.

सिंह :-
यांचे कोणतेही लिखाण आज उपलब्ध नाही. यांचा काळ ब्रम्हगुप्त च्या आधिचा होता.

पांडूरंग :-
यांचेही लिखाण आज उपलब्ध नाहि.

पद्मनाभ :-
यांचा काळ इ. स. ७०० च्या आसपास चा मानतात. भास्कराचार्यांच्या ग्रंथात यांचा उल्लेख आढळतो. यांनी बीजगणिताचा गाढा अभ्यास केला होता.

श्रीधर :- (इ. स. ८७० ते इ. स. ९३० च्या आसपास)
हे सुद्धा बीजगणितीच होते. यांचा त्रीशतिका, पाटीगणित, गणितसार व आणखी काही ग्रंथ लिहिले होते. यांनी द्विघात समीकरण सोडवण्याचेहि सुत्रे दिली. यांनी शुध्द गणितावर सुध्दा खुप लिखाण केले होते. यांनी सुध्दा शुन्याची व्याख्या केली होती.

माधव :- (इ. स. १३५० ते इ. स. १४२५)
भास्कराचार्यांच्या सिध्दांत शिरोमणी या ग्रंथात यांचा उल्लेख आहे. यांचा बद्दल सविस्तर माहिती नाहि. यांनी अनंत श्रेणियों,  कलन (कैलकुलस),  त्रिकोणमिती,  बीजगणित या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. यांनी १)गोलावाद २)मध्यमानयानप्रकर ३) महाज्ञानयानप्रकर ४) लग्नप्रकरण ५) स्फुटचन्द्राप्ति ६) अगणित-ग्रहचार ७) चंद्रवाक्यानी हे ग्रंथ लिहिले होते असे म्हणतात.

मुंजल  (इ. स. ८५४ ते इ. स. ९३२ च्या आसपास) :-
वेदांमध्ये सुध्दा गणिताच्या (बीजगणित) काही संकल्पना आहे हा विचार यांनी पहिल्यांदा मांडला. यांचा लघुमानसकरण हा ग्रंथ उपलब्ध आहे.

शतानंद :-
दशमान पध्दती सारखी शतमान पध्दत बसविण्याचा यांनी एक असफल प्रयत्न केला होता. शत संख्येवरच्या या प्रेमामुळेच कदाचित यांनी शतानंद हे नाव घेतले.

            मला आशा आहे की तुम्हाला माझि ही पोस्ट नक्कीच आवडली असेल. तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली? ही पोस्ट आवडली असल्यास किंवा माझ्या पोस्ट मधे जर काही चुकले असेल तर तर कृपया comment नक्की करा.
आपल्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत....!

टिप्पण्या