मुख्य सामग्रीवर वगळा

शेरलॉक होम्स च्या रहस्य कथा

       मी शेरलॉक होम्स च्या रहस्य कथा एकत्र करण्यासाठी ही पोस्ट करत आहे. या कथा वाचण्यासाठी काही दिवसांपासून internet वर शोधत आहे. पण मला त्या एकत्रपणे मिळाल्या नाहीत अशीच अडचण तुम्हाला असेल तर माझी ही पोस्ट तुमच्यासाठीच आहे.

       शेरलॉक होम्स हे एक अस नाव आहे जे माहित नसणारा वाचक मिळण जगातील कुठल्याही प्रगतशील वाचकवर्ग असणाऱ्या देशात महाकठीण बाब म्हणावी लागेल. शेरलॉक होम्स च्या रहस्य कथेंचा वाचकवर्ग खुप मोठा आहे. आजही गुप्तहेर कथा म्हणजे डॉयल यांच्या शेरलॉक होम्स कथा हे समीकरण झालेल आहे. जगातल्या सगळ्यात जास्त वाचल्या जाणाऱ्या रहस्य कथा संग्रहांपैकी हा एक महत्वाचा कथा संग्रह आहे.
       साधारणपणे कुठलीही रहस्य कथा एकदाच वाचावी वाटते कारण रहस्य कथेचे रहस्य माहीती पडल्यावर त्यातली गोडी निघून जाते पण या कथा संग्रहातील सगळ्या कथा या गोष्टीला अपवाद ठरतात. शेरलॉक होम्स ची एखादी कथा वाचायला घेतली की ती पुर्ण होऊपर्यंत पुस्तक बंद करावसं वाटतं नाही.
       सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या लेखणीतून अवतरलेल्या या मानसपुत्राने १२० वर्षापेक्षा जास्त काळापासून वाचकांना अगदी वेड लावले आहे अस म्हणल तरी ते चुकीचे ठरणार नाही. शेरलॉक होम्सच्या प्रकाशन काळात अनेक लोकांना शेरलॉक ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा नसून प्रत्यक्षात कोणी व्यक्ती आहे असच वाटायच आणि आजही काहि प्रमाणात हा प्रभाव काही लोकांवर दिसून येतो.
       सर आर्थर कॉनन डॉयल यांनी कथा लिखाण करतेवेळी कथेतील रहस्याईतकच ते रहस्य होम्स कसा उलगडतो याच विस्तृत व तर्कशुद्ध वर्णन केल्यामुळे वाचकांबरोबरच जगातील अनेक गुप्तहेर कथा लेखकांना प्रेरणा दिली.
       रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत काम करणारा उंचापुरा भेदक नजर, चाणाक्ष, सतत कोणत्यातरी विचारात कींवा अभ्यासात हरवलेला वेगवेगळ्या विषयांच सखोल ज्ञान असलेला, तर्कसंगत विचार करणारा त्याच्याच अनुसार एखाद्या गोष्टीच पुर्णज्ञानासाठी काहीही करणारा, गुन्हेगारी जगताच्या ईतिहासाचा जाणकार. शेरलॉक होम्सला काही क्षेत्रातील ज्ञान अफाट असल तरी साध्या साध्या गोष्टीच त्याच ज्ञान अगदी नगण्यच.
माणसाच आयुष्य हे वेगवेगळ्या घटनांची एक साखळी आहे त्यातलि एका कडीच्या निरीक्षण करुन बाकीच्या कडींचा अंदाज बांधता येतो अस ठाम मत असणारा. काल्पनिक कथांमध्ये निरीक्षण - निष्कर्ष शास्त्राचा बेताज बादशाह... शेरलॉक होम्स
       सुतावरून तर्कसंगतपणे स्वर्ग गाठणारा हा गुप्तहेर वाचकांच्या पसंतीस असा काही  उतरला की आज १२० वर्षापेक्षा जास्त काळ होऊनही वाचकांच्या मनात त्याच स्थान अढळ आहे.
मला अंतरजालावर (internet) वर ज्या अनुवादित कथा भेटल्या त्यांची लिंक दिली आहे.
१) अंतिम लढत
२) ब्रूस पार्टिंग्टन प्लॅन्स (१)   (२)   (३)   (४)   (५)
३) तीन विद्यार्थी !!!  (१)  (२)  (३)
४) नौदलाच्या कराराचा मसुदा  (१)  (२)  (३)  (४)  (५)
५) शेरलॉक - १) अ‍ॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य  २) कॉपर बीचेसचे रहस्य

तुम्हाला जर शेरलॉक होम्स च्या कथांचे पुस्तक खरेदी करायचे असेल तर इथे क्लिक करा. 

मित्रांनो तुम्हाला internet वर आणखीन अनुवादित कथा सापडल्या तर कृपया comment नक्की करा...

मला आशा आहे की तुम्हाला माझि ही पोस्ट नक्कीच आवडली असेल. तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली? माझ्या पोस्ट मधे जर काही चुकले असेल तर किंवा तुम्हाला काही प्रश्न असतिल तर कृपया comment नक्की करा.
आपल्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत....!
या पोस्ट्स ही आवडतील :-
चाणक्य - ओळख एका कादंबरीची

टिप्पण्या