मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय गणिती (गणितज्ञ) - आर्यभट्ट प्रथम

         भारत आणि गणित हे असे दोन विषय आहेत की ज्यातल्या एकाच्या महानतेची कहानी सांगायची झाल्यास दुसर्‍याचा उल्लेख केल्याशिवाय ती पुर्ण होणार नाही. तर मग भारताने गणितात जगाला असे काय योगदान दिले आहे की की भारताच नाव गणित इतिहासाशी जोडले जाते?            तस पाहिल तर भारतात अनेक महान गणितज्ञ होऊन गेले. पण कोण होते ते? त्यांनी असे कुठले शोध लावले की गणित इतिहासात त्यांचे नाव अमर झाले? तुम्हाला सुद्धा असेच प्रश्न पडलेत? तर चला या सगळ्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे शोधुयात.प्रत्येक गणितीच (गणितज्ञाच) कार्य इतकं महत्वाचे आहे की सगळ्याच नाव आणि माहिती सांगणे गरजेचे आहे पण मला माहिती व जागे अभावि सध्या अवघड आहे.          सुरुवात कुठून करावी? .... आज आपण कुणालाही (गणिता संदर्भात) खुप शहाणा समजतोस का? असा टोमणा मारायचा झाला तर आपण सहजपणे त्याला स्वतःला काय आर्यभट्ट समजतोस का? असे म्हणतो. भारताच्या प्रथम उपग्रहाचे नाव सुध्दा याच गणितज्ञाची आठवण म्हणून आर्यभट्ट ठेवण्यात आले. ठिक आहे तर मग सुरवात आर्यभट्ट प्रथम (aryabhatta pratham) पासूनच करुयात.. आर्यभट्ट प्रथम आर्यभट्ट  (aryabhatta) :-  

भारतीय गणिती (गणितज्ञ) - भास्कराचार्य

भास्कर दि्वतीय ( भास्कराचार्य ) ( Bhaskaracharya in marathi )        मित्रांनो आपण कुठल्याही गणितीच नाव घेताना सरळ सरळ त्यांच्या नावानेच संबोधित करत असतो. उदा. ब्रम्हगुप्त , लाटदेव इ. पण आज आपण एका अशा भारतिय गणिती बद्दल जानुन घेणार आहोत ज्यांच नाव भारतिय गणिती इतिहासामध्ये अत्यंत आदराने घेतले जाते. इतकेच काय तर त्यांच्या नावापुढे सुध्दा आपण आदराने आचार्य हे पद जोडले. कारण ते आपल्यासाठी फक्त एक गणिताचे संशोधक किंवा वैज्ञानिक नसुन वंदनीय गुरू सुध्दा आहेत. त्यांच्या अनेक गणित सूत्रांचा शोध पाश्चिमात्यांना १७ व्या शतकापर्यंत लागला नाही . पृथ्वीचा परीघ मोजणाऱ्या प्रथम काही गणितींपैकि भास्कराचार्य हे एक गणिती होते.        त्यांनी रचलेले ग्रंथ फक्त गणिताने भरलेले नसुन काव्य संग्रहाने , निसर्ग व तत्कालीन सांस्कृतिक वर्णनाने सुध्दा परिपूर्ण आहे अस म्हणाल तरी ते चूकिचे ठरणार नाही. हो हे तेच भास्कराचार्य आहेत ज्यांचा लीलावती ह्या ग्रंथाला संपुर्ण जगात प्रसिध्दि मिळाली.        भास्कराचार्य यांचा जन्म सन १११४ मध्ये महाराष्ट्रातील विज्जलविड (आजचे चाळीसगावातील पाटण) येथे झाला. त्या