मुख्य सामग्रीवर वगळा

भारतीय गणिती (गणितज्ञ) - भास्कराचार्य

भास्कर दि्वतीय ( भास्कराचार्य ) ( Bhaskaracharya in marathi )

       मित्रांनो आपण कुठल्याही गणितीच नाव घेताना सरळ सरळ त्यांच्या नावानेच संबोधित करत असतो. उदा. ब्रम्हगुप्त, लाटदेव इ. पण आज आपण एका अशा भारतिय गणिती बद्दल जानुन घेणार आहोत ज्यांच नाव भारतिय गणिती इतिहासामध्ये अत्यंत आदराने घेतले जाते. इतकेच काय तर त्यांच्या नावापुढे सुध्दा आपण आदराने आचार्य हे पद जोडले. कारण ते आपल्यासाठी फक्त एक गणिताचे संशोधक किंवा वैज्ञानिक नसुन वंदनीय गुरू सुध्दा आहेत. त्यांच्या अनेक गणित सूत्रांचा शोध पाश्चिमात्यांना १७ व्या शतकापर्यंत लागला नाही. पृथ्वीचा परीघ मोजणाऱ्या प्रथम काही गणितींपैकि भास्कराचार्य हे एक गणिती होते.



       त्यांनी रचलेले ग्रंथ फक्त गणिताने भरलेले नसुन काव्य संग्रहाने, निसर्ग व तत्कालीन सांस्कृतिक वर्णनाने सुध्दा परिपूर्ण आहे अस म्हणाल तरी ते चूकिचे ठरणार नाही. हो हे तेच भास्कराचार्य आहेत ज्यांचा लीलावती ह्या ग्रंथाला संपुर्ण जगात प्रसिध्दि मिळाली.

       भास्कराचार्य यांचा जन्म सन १११४ मध्ये महाराष्ट्रातील विज्जलविड (आजचे चाळीसगावातील पाटण) येथे झाला. त्याच्या जनन्मगावाबद्दल खुप काळ वाद चालू होता पण शेवटी त्यांचा जन्म आजच्या चाळीसगाव येथिल पाटण या ठीकाणी झाला आहे हे आता स्पष्ट झाले आहे. त्यांच्या वडिलाचे नाव महेश्वर होते. त्यांच शिक्षण त्याच्या वडिलांकडेच झाले. त्यांनी गोलाध्याय (याच ग्रंथातिल लीलावती व बीजगणित हे भाग आहेत.) हा ग्रंथ लिहिण्याआगोदर आठ व्याकरणग्रंथ (कदाचित पाणिणींचा अष्टाध्यायी हा ग्रंथ), सहा वैद्यकग्रंथ, सहा तर्कशास्त्रावरील ग्रंथ, पाच गणितग्रंथ, चारही वेद, पाच भरतशास्त्रे व दोन मीमांसा ग्रंथ यांचा अभ्यास पूर्ण केला होता. यावरून आपण त्यांच्या विद्वते आणि बुध्दिमत्तेबद्दल अंदाज बांधु शकतो.

       बाकिच्या ग्रंथांबाबत तर सांगता नाही येणार पण आपण सगळ्यांनी लीलावती या ग्रंथाचे नाव नक्किच ऐकले असेल.  लीलावती हा ग्रंथ अत्यंत सुंदर वर्णणाने भरलेला आहे. भास्कराचार्य यांच्या काळात लेखना पेक्षा पाठ करण्यावर लोकांचा भर असायचा त्यामुळे भास्कराचार्य यांनी लीलावती हा ग्रंथ काव्यात्मक पध्दतीने लीहिलाय. या ग्रंथात काव्य इतक्या सुरेख पध्दतीने मिसळले आहे कि, कित्येक वेळा वाचनाऱ्याला संशय व्हावा की आपण नक्की गणिताचा ग्रंथ वाचतोय का एखादा कवितेचा ग्रंथ वाचतोय. त्यांचा लीलावती हा ग्रंथ खुप प्रसिध्द झाला. त्यांच्या लीलावती व बीजगणित या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले.

       भारतात अनेक काळ हा यांच्या ग्रंथांबद्दल ( विषेश करून बीजगणित आणि लीलावती या ग्रंथांबद्दल ) अशी अफवा पसरली होती की या ग्रंथांचा अभ्यास केल्यावर सामान्य माणूस देखिल झाडाची पाने सुध्दा मोजता येतात. कदाचित तुम्हिसुध्दा ही अफवा ऐकली असेल. अर्थात ही एक अफवा होती किंवा आहे. पण म्हणतात ना कुठल्याही अफवेमागे कुठेतरी एक सत्य लपलेले असते. बाकी काही असो पण या अफवेवरुन आपल्याला त्यांच्या ग्रंथांचे महात्म्य व प्रसिध्दि नक्किच लक्षात येते.  लीलावती हा ग्रंथ जवळ - जवळ सहा शतके भारतात गणिताचा पाठ्यक्रम म्हणून वापरण्यात आला..
       भास्कराचार्यांच्या ग्रंथांमध्ये कलनशास्त्र, त्रिकोणमिती, वर्ग समीकरण वगैरे सारखे किचकट विषय सुध्दा त्यांनी हाताळले आहेत.

भास्कराचार्य रचित ग्रंथ :-

१) सिध्दांतशिरोमणी
२) करणकुतूहल
३) सर्वतोभद्रयंत्र
४) विवाहपटल
५) वसिष्ठतुल्य

       मला आशा आहे की तुम्हाला माझी ही पोस्ट नक्कीच आवडली असेल. तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली? ही पोस्ट आवडली असल्यास किंवा माझ्या पोस्ट मध्ये जर काही चुकचे असेल तर कृपया comment नक्की करा.
आपल्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत..!


टिप्पण्या