मुख्य सामग्रीवर वगळा

भारतीय गणिती (गणितज्ञ) - श्रीनिवास रामानुजन


श्रीनिवास रामानुजन (Srinivas Ramanujan)
        मित्रांनो... फक्त भारताच्याच नाहि तर संपुर्ण जगाच्या ईतिहासात असे अनेक व्यक्ति होऊन गेले आहेतज्यांच्या प्रतिभेने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलेत्याच व्यक्तिंमधल्या एका व्यक्तिचं नाव आहे "श्रीनिवास रामानुजन". ३२ वर्षाच्या लहानशा आयुष्यात त्यांनी नव्या - जुन्या अशा एकूण ३८८४ प्रमेयांच संशोधन - संकलन केले, तर चला सुरू करुया एका महान भारतीय गणिती बद्दलचा आजचा आपला ब्लॉग भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन (srinivramanujan in marathi).


Srinivas Ramanujan


        रामानुजन चा जन्म २२ डिसेंबर १८८७ साली दक्षिण भारतात कोयंबतूर मधिल ईरोड या गावि एका ब्राम्हण परीवारात झाला. यांच्या आईचं नाव कोमलताम्मल आणि वडिलांचं नाव श्रीनिवास अय्यंगार असे होते. म्हणतात की रामानुजनचे वडिल एका दुकानामध्ये दिवाण (मुन्शी) होते. तसे याचं लहानपण मंदिरांसाठी प्रसिध्द असणाऱ्या कुंभकोणम इथेच गेले. लहानपणी यांच्या घरातल्या व्यक्तिंना चिंता होती की रामानुजन मुका तर नाही ना? कारण, रामानुजन जवळ - जवळ तीन वर्षापर्यंत बोलायला सुध्दा शिकला नव्हता. असे
        रामानुजन शाळेच्या अभ्यासात खुप हुशार होता. रामानुजनला प्रश्न विचारायला खुप आवडायचे, तो सतत काहि ना काहि विचारतच असे. त्याच्या शिक्षकांना सुध्दा रामानुजनचे प्रश्न थोडे विचित्रच वाटत. जसेकी जगातला पहिला माणुस कोण? धरती आणि आभाळात अंतर किती आहे? वगैरे वगैरे? एकादा तर गणिताचे शिक्षक भागाकार शिकवत असताना त्यांनी भागाकाराचा पुढिल नियम सांगितला "जर एखाद्या संख्येने  त्याच संखेला भाग दिला तर उत्तर येते." शिक्षकांच बोलण पुर्ण झाल्याझाल्याचं रामानुजनने शिक्षकांना विचारले की जर शुन्याने शुन्याला भाग दिला तरीहि उत्तर एकचं येईल का?
        रामानुजन त्याच्या गणितप्रेमामुळे गणितातिल विलक्षण बुध्दिमुळे लहानपणीच गावात प्रसिध्द होता. एकदा इन्सपेक्षणसाठी आलेल्या एका आधिकाऱ्याने रामानुजनच्या वर्गात येऊन विद्यार्थ्यांना एक गणित विचारले की समजा तुमच्या वर्गात एकूण १०० मुले आहेत, मला पहिल्या मुलाला रु, दुसऱ्या मुलाला रु, तिसऱ्या मुलाला रु असे सगळ्याना पैसे द्यायचे आहेत तर मला एकूण किती रुपये द्यावे लागतिल? प्रश्न विचारुण काहि क्षणचं गेले असतिल की लगेच रामानुजनने उत्तर दिले ५५० रु पुरतिल.
एक प्रतिभाशालि पण दुर्दैवि व्यक्ति असा जर रामानुजनचा उल्लेख केला तर ते अयोग्य ठरणार नाहि.  कारण, रामानुजनला सदैव कुठल्या ना कुठल्या प्रकाराच्या समस्यांना सामोरे जावेच लागले. रामानुजनला गणितात कुठल्याही प्रकारचे विशेष असे प्रशिक्षण मिळाले नव्हते आणि असे असून सुध्दा त्यांनी गणित जगात इतक्या मोठ्या प्रमाणात संशोधन केले. रामानुजनची गणितं सोडविण्याची पध्दत सुध्दा विचित्रच होती. तो अनेक वेळा झोपेतून उठून पाटीवर गणिताची सूत्रे लिहुन काढत असे. कदाचित रामानुजन झोपेत सुध्दा गणिताचाच विचार करत असावा. आणखिण एक म्हणजे रामानुजन कुठलेहि प्रमेय आधि लिहूण काढायचा पण प्रमेयाच्या उपपत्तीकडे किंवा स्पष्टीकरणाकडे इतक लक्ष देत नसे. कित्येक लोक रामानुजन ला दैवी देणगी लाभलेला गणितज्ञ समजतात कारण. ते गणितच इतक्या गतिने करत की लोकांना त्यांनी ते कस केले याचा काही अंदाजच लागत नसे. रामानुजन कीत्येक वेळा झोपेतून उठुन गणिते करायला लागत असे. त्याच मन कदाचित झोपतसुघ्दा गणिताचाच विचार करत असावा अणि त्याचाच परीणाम म्हणून त्याची गणिताची प्रतिभा असावी असे मला वाटते.


             मला आशा आहे की तुम्हाला माझि ही पोस्ट नक्कीच आवडली असेल. तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली? ही पोस्ट आवडली असल्यास किंवा माझ्या पोस्ट मधे जर काही चुकले असेल तर तर कृपया comment नक्की करा.
आपल्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत....!
(dze”k:)

टिप्पण्या