मुख्य सामग्रीवर वगळा

द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन



खुप वर्षापुर्वीची गोष्ट आहे एका  बॅबिलॉन नावाच्या शहरामध्ये अरकाद नावाचा माणूस राहत होता. तो खुप दयाळू होता जो खुप पैसे दान करायचा आणि खुप पैसे खर्च करायचा पण तरीही संपत्ती सदैव वाढतच असायची तेही इतकी तो ती संपत्ती पूर्णपणे खर्चसुध्दा करू शकत नसे. एका दिवशी त्याला त्याचे जूने मित्र भेटले जे खूप वाइट आर्थिक परीस्थितित होते. त्यांनी अरकाद ला विचारले की तू इतका नशिबवान कसा काय आहेस की जिथे आम्हाला जगण्यापुरत मिळवण अवघड आहे तिथे आज तू बॅबिलॉन मधला सगळ्यात श्रीमंत व्यक्ति बनला आहेस. तु महागडे कपडे घलतोस चांगले पक्वांन्न खतोस पण आम्ही त्याबद्दल विचार सुध्दा करू शकत नाही. एक वेळ होता ज्यावेळी आपण सगळे एकसारखेच होतो आपण एकाच शाळेत गेलोएकाच शिक्षकांकडून शिक्षण घेतलंएक सोबत खेळलो वाढलो त्यावेळी तर तू आमच्या सारखाच सर्वसामान्य होतासना तूझ्याकडे वेगळे आणि विशिष्ठ असे काही कौशल्य होते. आपण मेहनत सुध्दा एक सारखिच केली मग असे का की देवानी फक्त तुझ्यावरच कृपा केली तु या शहरातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ति बनलास आणि आम्हि मात्र आजही गरीबच आहोत?
हे ऐकुन अरकाद बोलू लागलानक्किच मित्रांन्नो मला तूम्हाला माझ्या संपत्तीमागचे रहस्य सांगायला नक्कीच आवडेलआपल्या मधला हा फरक या मुळे आहे की तुम्ही इतक्या वर्षात संपत्ती मिळवण्याचे नियम कदाचित शिकलाच नाहित किंवा तुम्हि ते नियम विसरले आहात पण ठिक आहे मी स्वत:चा भुतकाळ सांगून तुम्हाला हे नियम शिकवेल. ज्यावेळी मी जवान होतो त्याच वेळी याची सुरवात झाली मी माझ्या आजूबाजूच्या चांगल्या वस्तू ज्यावेळी बघायला लागलो त्यावेळी माझ्या लक्षात आले की संपत्ती या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी खुप गरजेची आहे. संपत्ती आपल्याला हव तसं राहण्याचे स्वातंत्र्य देते पाहिजे ते मिळवण्याची ताकद देते हे लक्षात आल्या नंतर मी निर्णय घेतला की मी सुध्दा हे आर्थिक स्वातंत्र्य नक्कीच मिळवेल. मी मृदापत्र लिहायला शिकलो आणि अनेक महिने मृदापत्र लिहण्याचे काम करुन सुध्दा मला काही परीणाम दिसत नव्हता मी जे काही कमावत होतो ते सगळे महीन्याच्या शेवटपर्यंत गरजेच्या वस्तू घेण्यात संपून जात असे.
एका दिवशी अलकमिश नावाचा एक श्रीमंत व्यक्ति माझ्याकडे आला त्याला काही मृदापत्र लिहून पाहीजे होते तो म्हणाला की जर तू माझे हे काम दोन दिवसात पूर्ण करून दिलेस तर मी तुला कॉपर चे शिक्के बक्षीस देईल हे एैकुन मी चिकाटीने काम करायला सुरू केले पण दाने दिवसांनी जेव्हा अलकमिश ते मृदापत्र घ्यायला आला त्यावेळी त्याच काम पूर्ण झालेल नव्हतेते बघुन तो माणूस खूप रागावला. पण तरीही मी हिमतीने त्याला म्हणालो "अलकमिश तुम्हि खुप श्रीमंत आहात मलासुध्दा तुमच्यासारख खुप श्रीमंत व्हायचय कृपया मला श्रीमंत कसे व्हावे हे सागणार असाल मी तुम्हाला वचन देतो तुमचे हे काम उद्यापर्यत पुर्ण करून देईलतेही मोफत. " अलकमिश हसायला लागले आणि म्हणाले की मला तुझि ही हिंमत आवडली ठिक आहे तर जर तू माझ हे काम उद्यापर्यंत पुर्ण केलेस तर मी तुला माझ्या श्रीमंतीची गुपिते सांगेल.
मी रात्रभर काम करुन त्यांचे मृदापत्र तयार केले. दुसऱ्या दिवशी जेव्हा अलकमिश आले तेव्हा मी त्यांना सांगितले की तुमचे काम पुर्ण झालेले आहेकृपया आता मला तुमच्या श्रीमंतीचे गुपित सांगा.अलकमिश म्हणालेठीक आहे ध्यान देऊन ऐक, मला श्रीमंत होण्याचा मार्ग तेव्हा मिळाला, जेव्हा मी ठरवले की मी जे काही कमावतो त्याचा एक हिस्सा मी स्वत:ला द्यायला हवा. मी विचार करून विचारले एवढेचहोते हसतच पण ठामपणे म्हणाले. या एका एवढ्याशा निर्णयाने एका मेंढपाळाला एक श्रीमंत माणूस बनवले जो आज तूझ्या समोर उभा आहे. मला सांग अरकाद तु कपडे शिवण्याऱ्याला तुझे कपडे शिवण्याचे पैसे देतोसच नातुझ्या चांभाराला सुध्दा पैसे देतोसच नाआणि आनखिन लोकांना त्यांच्या कामाबद्दल पैसे देतोसच नामग मला सांग की तुझ्या मागच्या महिन्याच्या कमाई मधुन तुझ्याकडे आत्ता किती शिल्लक आहेतकिंवा तुझ्या मागच्या वर्षाच्या कमाईतला किती पैसा तुझ्याजवळ बाकी आहे? "तु वेडा आहेस अरकाद जे तु बाकि सगळ्यांना तर त्यांच्या कामाचे पैसे देतोस पण स्वत:ला देत नाहीस. लक्षात तो प्रत्येक सोन्याचा शिक्का जो तु स्वत:ला देशिल तो तुझ्या नौकरा सारखा असेल जो तुझ्या साठी काम करेल आणि तुला अणखिण तांब्याचा शिक्का कमावून देईलजर तुला खरचं श्रीमंत व्हायच असेल तर तु तुझ्या बचतीला कामाला लावुन त्याने पैसे कमावले पाहिजेस अणि जी कमाई झाल्या नंतर त्या कमाई कडूनही काम करून घेऊन तु कमाई करायला पाहिजेस" माझ्या या बोलण्याला हलक्यात घेऊ नकोस, तुला दिलेल्या ह्या ज्ञानाचे मुल्य तु केलेल्या माझ्या कामाच्या मुल्यापेक्षा कित्येकपटीने जास्त आहे. तुझा कमाईतला एक हिस्सा जो तुझ्या कमाईच्या १०% पेक्षा कमी नसावा तो पुर्णपणे तुझा आहेतुझा हिस्सा तु वेगळा ठेवायला हवा. तुला माहित आहे धन एखाद्या झाडासारख असते जे एका बीजा पासून उगवतेआणि तु केलली पहिली बचत हे त्याच बीज असतं. तु स्वत:ला तुझा कमाईच्या १०% स्वत:ला देण हे त्या झाडाला पाणी देण्यासारख आणि त्याची निगा राखण्यासारख असतंतू हे जितक्या लवकर सुरू करशिल तितक्याच लवकर तू त्या झाडाच्या सावलीत आराम करू शकशील.. हे बोलून अलकमिश निघुन गेले.


Tree of Money 

मी त्यांनी मला दिलेल्या या ज्ञानाचा उपयोग करायला सुरू केले. त्या नंतर मी जे काही कमवायचो त्यातला दहावा हिस्सा मी वेगळा ठेऊ लागलोआश्चर्याची बाब ही होती की मी माझ्या कमाईचा दहावा हिस्सा वेगळा काढुन देखिल मला माझा खर्च चालवायला जास्त त्रास झाला नाही. मी पुर्ण वर्षभर दर महिन्याला त्यांच्या बोलण्या प्रमाणे वागलो आणि स्वत:च्या कमाईचा दहावा हिस्सा वेगळा काढुन ठऊ लागलो. एक दिवस अलकमिश मला भेटायला आले त्यांनी मला विचारले की माझि बचत कशी चालू आहेमी म्हणालो की चांगली चालू आहे. मग त्यांनी विचारले की मग काय केलस तू वाचवलेल्या पैशांचेमी त्यांना सांगितले की मी ते पैसे माझ्या एका मित्राकडे दिले जो समुद्रामार्गे दुसऱ्या देशात गेला आहेतो तिथिन सोन्याचे काही दागिने स्वस्तामध्ये आणणार आहे आणि मग आम्हि ते दागिने बॅबिलॉन मध्ये वाढीव किंमती मध्ये विकून नफा कमावणार आहोत. त्यांनी मला विचारले की माझा तो मित्र ज्याला पैसे दिले तो हेच काम करतो कायावर मी त्यांना सांगितले तो नाहीतो तर एक कुंभार आहे. हे ऐकून अलकमिश खुप रागावले ते म्हणाले की तू एका कुंभारावर कसा काय भरोसा करु शकतोस की तो सोन्याच्या दागिण्याबद्दल जाणकार असेलमला सांग की तु एखाद्या दुकानदाराकडे जाऊन तुझ्या भविष्याबद्दल विचारशिल कायमला वाटत जर तू थोडा जरी समजदार असलास तर तू भविष्या बद्दल विचारायला एखाद्या ज्योतिषाकडे जाशिल. तू दागिने आणण्यासाठी एखाद्या सोनाराला पैसे द्यायला हवे होते ज्याला सोन्याच्या दागिण्याची समज असेल. जाऊदे झाल ते झालं तू आता परत पैसे जमवायला सुरू कर एवढ बोलून ते निघून गेले. त्यांच बोलण बरोबर निघालं माझ्या मित्राला सोन्याची समज नसल्यामुळे मुर्ख बनवलं गेलं होतंतो नकली दागिने घेऊन आला होता त्यामुळे आमचे पैसे बुडाले होते आणि आम्हि आता त्यावर काही करूही शकत नव्हातो.
मी हारलो नाहीमी पुन्हा नव्याने सुरवात केली आणि एक वर्ष झाल्यावर जेव्हा अलकमिश परत मला भेटायला आले तेव्हा मी त्यांना सांगितले की यावेळी मी माझ्या पैशाने पितळ विकत घेतलं आणि ते एका ढाल बनवणाऱ्याला दिलं जो मला काहि महिन्यांच्या अंतरावर त्याला त्यातून होणाऱ्या नफ्याचा काही हिस्सा मला देतो. अलकमिश हे ऐकून खुश झालेत्यांनी मला विचारले की मी त्या पैशांचे काय करतोमी त्यांना सांगितले की मिळालेल्या त्या पैशामधुन कपडे आणि इतर चैनिच्या वस्तू खरेदि केल्यायावर अलकमिश हसायला लागले आणि म्हणाले तू तुझ्या पैशाच्या झाडाला वाढण्याआगोदरच कापून टाकतोयस अशाने तू त्या झाडाच्या सावलित आराम कसा करशिलजर तू असच करत राहीलास तर पुन्हा तिथेच पोहोचशिल जिथून तू सुरू केलं होत. तू तुझ्या बचतीच्या मुलांना संपवतोयस तु तुझ्या बचतीने कमावलेल्या पैशांना फालतूच्या गोष्टिंवर खर्च न करता परत त्यांची सुध्दा गुंतवणूक करायला हवी आणि असंच करत करत एक वेळी ज्यावेळी तुझ पैशांचं झाड इतकं मोठ झालेले असेल की तू त्याच्या सावलित विश्रांती करू शकशिल. म्हणजेमी विचारले. ते म्हणाले तू जर तुझ्या बचतीने कमावलेल्या पैशांची सुध्दा गंतवणूक केली आणि त्यातून पैसे मिळवलेस आणि असेच करत राहीलास तर एक वेळ येईल ज्यावेळी तुझि संपत्ती इतकी वाढलेली असेल की तू तुला हवे तितके पैसे खर्च करूनही तुझि संपत्ती कमी होणार नाही. पण ती वेळ येई पर्यंत तू धैर्य ठेवायला हवं.
त्यानंतर दोन वर्षांनी मला भेटायला आलेत्यांनी मला माझ्या व्यवसायाबद्दल विचारले. मी म्हणालो आत्ता पर्यंत जेवढे पैसे हवे होते तेवढे तर मी अजूनही कमावत नाही आहे पण हो एक नक्कि आहे की आता माझि गुंतवणूक माझ्यासाठी पैसे मिळवत आहे आणि माझ्या गुंतरवणूकीचा परतावा आणि परत त्याच्याही परताव्यातून मिळावलेले पैसे माझ्यासाठी मेहनतीने आणखिन पैसे मिळवत आहे. शेवटी मी तुमच्या मार्गदर्शनामुळे संपत्ती कशी कमवायची हे शिकलो आहे. आणि आता मला विश्वास आहे की मी लवकरच माझ्या आर्थिक ध्येयापर्यंत पोहचेल. हे ऐकल्यानंतर अलकमिश ने मला हसतचं एक प्रश्न विचारला की काय तू आजूनहि कुंभारा कडुन सल्ला घेतोसमी म्हणालो "हो" तो मातिच्या विटांबद्दल योग्य सल्ला दतो. 
हे ऐकून ते संतुष्ट झाले व त्यांनी मला त्यांचा भागिदार बनवलं आणि तुम्हि सगळे बघतच आहात की मी कुठे आहे ते.
माझ्या श्रीमंतीचे सगळे गुपिते - रहस्य आणि नियम मी तुम्हाला या गोष्टीच्या माध्यमातून सांगितले आहेत. तुम्ही सगळे आता या ज्ञानाचा वापर कराल आणि श्रीमंत व्हालं अशी मी तुमच्या कडून अपेक्षा करतो.
मित्रांनो या गोष्टीमधुन आपल्याला महत्वाचे तिन नियम शिकायला मिळाले ते पुढील प्रमाणे :
१ सगळ्यात आधि स्वत:ला पैसे दृया - आपण कमावलेल्या पैशांचा कमीत कमी दहावा हिस्सा स्वत:साठी राखुण ठेवायला पाहिजे अणि राहीलेल्या नव्वद टक्के रकमे मधुन स्वत:चा खर्च चालवायला हवा. काहिहि होवो त्या पैशांना आपण तो पर्यंत बाजूला काढुन ठेवायला पाहिजे जो पर्यंत त्या पैशांची गुंतवणूक करायला योग्य संधी मिळत नाही
२ आपण बाजूला काढून ठेवलेल्या पैशांची गुंतवणूक करण्या आगोदर आपल्या नातेवाईकांकडून सल्ला घेण्या ऐवजी त्या व्यक्ति कडून सल्ला घ्यायला पाहिजे ज्या व्यक्तिला त्या क्षेत्रातली माहिती असेल आणि तो स्वत:सुध्दा ते काम करत असेल.
  आपल्या पैशाकडून काम करून घ्यायला शिका : ज्या वेळी आपण आपल्या गुंतवणुकीने पैसे मिळवू तेव्हा त्या पैशांचा फालतूचा खर्च करण्या पेक्षा त्या पैशांची तो पर्यंत पुन्हा - पुन्हा गुंतवणूक करत राहीलं पाहिजे जो पर्यंत आपली संपत्ती इतकी वाढत नाही की आपण खर्च करून सुध्दा आपलि संपत्ती कमी होणार नाही.

मी हि गोष्ट आणि हे सगळे नियम द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन ( The richest man in Babylon ) या पु्रतका मधुन सांगितले आहेया पुस्तकामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण पत्येकाने शिकल्या पाहिजेया पुस्तकामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण पत्येकाने शिकल्या पाहिजे तुम्हाला जर हे पुस्तक खरेदी करायचे असेल तर तुम्ही खालि दिलेल्या लिंक वरून खरेदी करू शकता.

मराठी पुस्तकाची लिंक : https://amzn.to/2TmcxgR

हिंदी पुस्तकाची लिंक : https://amzn.to/2HBTe1P: 

इंग्रजी पुस्तक : https://amzn.to/2TQkhgr

The Richest Man in Babylon या पुस्तकाचा हा सांरांश तुम्हाला कसा वाटला आणि यातून तुम्ही काय शिकलात हे comment करायला विसरु नका. जर तुम्ही हे पुस्तक याआधि वाचलेले असल्यास हे पुस्तक प्रत्येकाने एकदातरी का वाचावेया बद्दलच तुमच मत नक्कीच comment करुन सांगा ज्यामुळे इतरांनाही हे पुस्तक वाचण्यासाठी प्रेरणा मिळेल.
आपल्या comments च्या प्रतिक्षेत.

टिप्पण्या