मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नशिबाच्या दारावरचे कुलुप

काही वर्षांपूर्वी एक महान जादूगार खुप प्रसिद्धीस आला, त्याच्या या प्रसिद्ध कारण होते त्याची एक खास कला ज्यामधे त्याने प्राविण्य मिळवलेले होते. काय होती ती कला? अस काय होतं जे त्याला इतर जादूगरांंपासून वेगळ करत होते? तर ती कला होती कुलुप उघडण्याची कला हा जादूगर अगदी कोणतेही कुलुप असेल तरी ते इतक्या शिताफीने उघडायचा की बघणारा अक्षरशः अवाक होऊन पाहात रहायचा. आणि हेच ते कारण होते की हा जादूगर इतका प्रसिद्ध होता. तर त्याची ख्याती ऐकुन एका पोलिसाने त्याला आव्हान द्यायचे ठरवले. खरतर या आधि सुध्दा जादूगाराला अनेकदा असे आव्हान अनेकांनी दिले होते आणि जादूगाराने ते पुर्ण सुध्दा दाखवले होते आणि यामुळेच की काय पण त्याला या आव्हानाची काही खास काळजी नव्हतीच. ठरलेल्या वेळी जादूगार त्या पोलीस ठाण्यात आव्हान पुर्ण करण्यासाठी पोहचला, आता कारण खुप प्रसिध्द जादूगार असल्यामुळे जिथे हा प्रयोग व्हायचा होता तिथे खुप गर्दी झाली होती अनेक मिडिया वाले - सामान्य लोक यांनी ते स्थान अगदी तुडुंब भरले होते. जादूगार साठी हा नेहमीचाच प्रसंग होता त्याने असे अनेक प्रयोग यशस्वीपणे पार पाडले होते, तो आत्मविश्वासही त्याच्य