काही वर्षांपूर्वी एक महान जादूगार खुप प्रसिद्धीस आला, त्याच्या या प्रसिद्ध कारण होते त्याची एक खास कला ज्यामधे त्याने प्राविण्य मिळवलेले होते. काय होती ती कला? अस काय होतं जे त्याला इतर जादूगरांंपासून वेगळ करत होते? तर ती कला होती कुलुप उघडण्याची कला हा जादूगर अगदी कोणतेही कुलुप असेल तरी ते इतक्या शिताफीने उघडायचा की बघणारा अक्षरशः अवाक होऊन पाहात रहायचा. आणि हेच ते कारण होते की हा जादूगर इतका प्रसिद्ध होता. तर त्याची ख्याती ऐकुन एका पोलिसाने त्याला आव्हान द्यायचे ठरवले. खरतर या आधि सुध्दा जादूगाराला अनेकदा असे आव्हान अनेकांनी दिले होते आणि जादूगाराने ते पुर्ण सुध्दा दाखवले होते आणि यामुळेच की काय पण त्याला या आव्हानाची काही खास काळजी नव्हतीच. ठरलेल्या वेळी जादूगार त्या पोलीस ठाण्यात आव्हान पुर्ण करण्यासाठी पोहचला, आता कारण खुप प्रसिध्द जादूगार असल्यामुळे जिथे हा प्रयोग व्हायचा होता तिथे खुप गर्दी झाली होती अनेक मिडिया वाले - सामान्य लोक यांनी ते स्थान अगदी तुडुंब भरले होते. जादूगार साठी हा नेहमीचाच प्रसंग होता त्याने असे अनेक प्रयोग यशस्वीपणे पार पाडले होते, तो आत्मविश्वासही त्याच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता. आता वेळ आली होती की जादूगाराला बेड्या घालून त्या जेल मध्ये बंद करण्यात येणार होत. पोलिसाने आधि सर्वांचे स्वागत केले आणि बेड्या आणि त्या अत्यंत आधुनिक अशा कोठडी दरवाजाबद्दल सांगितल की या दरवाजाला असणारे कुलूप हे त्या प्रकारचे एकमेव कुलुप आहे, आणि त्या कुलुपाला विनाकील्लि उघडण्यात कोणीही सफल झालेलं नाही. अस सांगुन त्याने त्या जादूगाराच्या हातात बेड्या घातल्या व त्याला कोठडीत बंद केले. नियमानुसार जादूगार पुढच्या ५ मि. मध्ये बाहेर नाही आला तर त्याला कुलुप खोलन्यात अपयश आले हे त्याला मान्य करावे लागणार होते आणि कदाचित त्याचे जादूगरीचे करीयर सुध्दा सोडावे लागणार होते. पण जादूगाराला व तिथे जमलेल्या प्रेक्षकांना सुध्दा जादूगाराच्या यशा बद्दल खात्री होती. पोलिसाने शिट्टी वाजवून आव्हानाची वेळ सुरू झाल्याचा इशारा केला तसे सगळे शांत पणे जादूगाराकडे उत्सुकतेने पहायला लागले. ईकडे जादूगरीचे चतुराईने लपवलेली एक तारे सारखी वस्तू बाहेर काढली व त्याने बेड्या उघडण्याचा प्रयत्न करू लागला, बघता बघता एक मिनिटभर वेळेतच त्याने हातातल्या बेड्या काढुन सुध्दा टाकल्या.. त्याच्या कारनाम्यावर प्रेक्षकांनी अचंबित होऊन टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट केला. पण अजुन मुख्य आव्हान काही पुर्ण झालेले नव्हते, जादूगार पटकन कोठडीच्या दाराजवळ येऊन बसला आणि कुलुप उघडण्याचा प्रयत्न करायला लागला पण हे काय? दोन मिनिटापासून प्रयत्न करून सुध्दा उघडायला तयारच नव्हते. आता मात्र जादूगाराचा आत्मविश्वास ढासळायला लागला कारण आजपर्यंत त्याला कोणतेही कोठडीचे कुलुप उघडायला मग ते कीतीही आधुनिक असले तरी इतका वेळ लागलेला नव्हता. फक्त शेवटचा एकच मिनिट वेळ राहील्याचा पोलिसाने इशारा केला, आता मात्र दूगार आणखी व्याकुळतेने प्रयत्न करू लागला पण तरीही कुलुप काही उघडायचे नावचं घ्यायना... बास... वेळ संपला.... आणि शिट्टीचा आवाज आला... जादूगाराने निराश होऊन हार स्विकारली आणि रागा रागाने जोरात त्या कोठडीच्या दाराला एक झटका दिला... आता यानंतर जे झाले ते बघुन तिथे उपस्थित असणारे सगळेच त्या पोलिसाच्या चातुर्याने अवाक झाले.. माहीती आहे का? कारण.., कारण त्या पोलिसाने ते दाराला बंद केलेलेच नव्हते. जे बंदच नाही ते कोणी उघडणार कसे.? आणि तेच कारण होते की जादूगार कुलुप उघडुच शकला नाही.
आता ईथे प्रश्न असा आहे की जर पोलिसाने जर दाराला लाॅक केलेलेच नव्हते तर जादुगाराच्या लक्षात का आले नाही? उत्तर सुध्दा सोप आहे, कारण तो व्यस्त झाला. तो इतका व्यस्त झाला एक क्षण थांबून विचार सुद्धा केला नाही की आपण बघायला पाहिजे कुलुप खरेच लावलेले आहे का नाही? आणि दूसरी गोष्ट अशी की त्या पोलिसाच्या की हे जगातील सर्वात आधुनिक कुलुप आहे आणि कोणीही तोडण्यात सफल झालेल नाही या बोलण्यावर थोडासा का होईना पण त्याने विश्वास ठेवला आणि त्यामुळे तो तणावाखाली येऊन फक्त कुलुप कसे उघडता येईल याचाच विचार करू लागला.
आपण सुद्धा कित्येक वेळा असच नाही करत का? आपण सुद्धा अडचणीत सापडल्यावर लगेच त्याचे समाधान शोधण्यात व्यस्त नाही होत का? कित्येक वेळा तर आपण नेमकी अडचण काय आहे आणि कशामुळे आहे याचा विचारही न करता समाधान शोधण्यात व्यस्त नाही होत का? माझ्याबद्दल विचाराल तर अस माझ्यासोबत कित्येकदा होत की काही अडचण आली किंवा काही प्रश्न पडला की लगेच उत्तर शोधायला सुरवात करतो कींवा नकारात्मक विचार करण्यात, निष्कारण पणे येणार्या परिणामांबद्दल विचार करण्यात व्यस्त होऊन जातो... पण एक सांगू? मला त्यावेळी उत्तर लवकर मिळते ज्यावेळी मी पडलेल्या प्रश्नाला लगेच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्या ऐवजी नेमका प्रश्न काय आहे? हे समजून घेऊन नंतर त्यावर अॅक्शन घेतो.
"Do not react on every problem because every problem comes with opportunity or learning."
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा