मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

व्यस्तपणा आणि धावपळ

आजचे युग हे व्यस्तपणाच युग आहे. आज प्रत्येक जणं काही ना काही काम करण्यात व्यस्त आहे मान्य आहे की काही जणं खरेच काही तरी महत्वाची कामे करण्यात व्यस्त आहेत , आपल्यापैकी कित्येक जणं उगाचचं व्यस्त आहेत , किमान आपण तस स्वत:ला भासवत तरी आहोत. कधी कधी खरेच काम करण्यात व्यस्त आहोत , काही काम नसेल तेव्हा Game खेळण्यात व्यस्त आहोत T.V. बघण्यात व्यस्त आहोत अगदिच काही नसेल तेव्हा स्वत:च्याच भुतकाळाच्या आठवणिमध्ये व्यस्त आहोत , कोणी स्वत:च्याच भुतकाळा पासून पळ काढण्यासाठी व्यस्त आहे तर आणखि कोणी माहिती नाहि कशा - कशात व्यस्त आहे. पण आपण आज व्यस्त आहोत हे मात्र खरं आहे , बरोबर ना ? कारण व्यस्त राहणे ही आजकालची fashion होऊन बसलिए आपण जर व्यस्त नसतोल तर आज आपल्याला अस वाटते की आपण काहीतरी चूकिचे करत आहोत , की काय कारण आपण आज एका जागि शांत बसणे विसरत चाललोय . शांत बसायचे म्हंटल की अगदि नको - नको ते विचार आपल्या मनात यायला चालू होतात. अर्थात याला कित्येक जणं अपवाद असतिलचं. पणं सर्वसाधारण पणे म्हंटलं तरी हे सत्यच आहे की आपल्याला व्यस्त असण्याची सवय झालि आहे. खरे आहे ना ? पणं कित्येक गोष्टी ज्या आपण श