मुख्य सामग्रीवर वगळा

भरलेले गाडगे


हि थोडीशी जुनी गोष्ट आहे ज्यावेळी अनेकदा लोकं एका गावावरुन दुसऱ्या गावाला पायी चालत जात..
असाच आज एक माणूस आपल्या गावाहून शेजारच्या गावी चालला होता, रस्ता जनुकाहि मोकळाच क्वचितच एखादा प्रवासी दिसत होता. काहीसा पठारी प्रदेश आणि डोक्यावर तळपता सुर्य आणि यामुळे आलेला थकवा आणि लागलेलि तहान यामुळे त्या माणसाचा जिव अगदी कासाविस झाला होता, आता खर तर त्याला पलिकडचं गाव गाठण्यापेक्षा पाणि पिने जास्त गरजेचे होते. एक दोन वेळा आधि मित्रांसोबत याच रस्त्याने गेलेला असल्याने त्याला जवळच एक लहानसा तलाव असलेला माहीती होते, तो तलाव थोडा आडमार्गि असून देखिल तो त्या तलावा जवळ गेला...
एक... एक मिनिट थोडस थांबवतोय तुम्हाला पुढे सांगण्याआधि त्यासाठी माफ करा पण मला थोडस विचार करुन सांगा कि या परीस्थितित तुम्ही असता तर यावेळी तुम्ही काय केल असतं...?
तुम्ही म्हणाल काय मुर्खासारखे प्रश्न विचारतोय हा.. बरोबर ना? बरं जाऊद्या आपण गोष्ट पुढे नेऊयात. तलावा समोर गेल्यावर त्याला जरास हायसं वाटलं पण तो माणुस तसाच त्या तलावाकडे बघत ऊभा राहिला होता, त्यामाणसाला पाणि प्यायची इच्छा असून देखिल तो तसाच पण्याकडे बघत ऊभा होता. दुपारचि संध्याकाळ व्हायला आलि,  थोड्याच वेळात तिथे एक गूराखी आपल्या गुरांना पाणी पाजण्यासाठी आला तिथ यामाणसाला असा उभ असलेल बघुन सहजपणाने आपल्या गावठी लेहज्यात त्यानं विचारलं मग पाव्हनं कुण्या गावच म्हणायचं तुम्ही? त्या माणसाने काहीच उत्तर दिले नाही, यावर तो गुराखी म्हणाला "काय झाल पाव्हन कशापायी थांबलात इथ आडरस्त्याला, कोणाची वाट बघताय व्हय?" यावर त्याव्यक्तिने त्या गुराख्याकडे पाहिले आनि थोडसं हसु चेहऱ्यावर आणत नकारार्थी मान हलवलि आणि म्हणाला "मला पाणी प्ययचि इच्छा झालिय, तहान लागलिये खुप" यावर तो गुराखी म्हणाला एवढचं न्हवं मग प्या की पाणी, त्याला उत्तर देत तो व्यक्ति म्हणाला नाही, तस नाही मला इतकि तहान लागलिये की मला वाटतय की मी हा सगळा तलावच पिऊन टाकावा पण मला समजत नाहीये कि मी सुरवात कशी करावि. यावर त्या गुराख्याने त्या माणसाला एक छानसं स्मित दिलं आपल्या जवळच्या गाडग्यात तलावाच पाणि भरून घेतलं आणि गाडग त्या व्यक्तिच्या समोर धरुन त्याला म्हणाला कि "अस म्हणता व्हय, ठीकाय, तर करा मंग या गाडग्याला रीकामं करण्यापासून सुरवात."
कदाचित मला काय म्हणायचय ते या कथेतून लक्षात आलेच असेल... आपलिसुध्दा अवस्था कित्येक वेळा त्या थकलेल्या व्यक्ति सारखिच झालेलि असते एक तर मी मागच्या पोस्टमध्ये बोलल्याप्रमाणे आपण कुठलेही काम आले कोणताही विचार न करता लगेच धावपळ करायला सुरवात करतो नाहितर आजच्या कथेतल्या माणसासारखे फक्त विचारच करत बसलेलो असतो.
आपण रोज टिव्हि वर जाहिरात बघतो आज तुफानि करते है, किंवा कित्येक वेळा एखाद्या (प्रेरणादायक) मोटिवेशनल त्हिडियो मध्ये बघितलेले ऐकलेलं असते. बडा सोचो - बडा करो आणि असचं बरच काही.. पण आपण या सगळ्यामध्ये काहीतरी मोठ करण्याच्या चक्करमध्ये आपल्याकामातलि सरलता आणि सुटसुटीतपणा कित्येकवेळा गमावून बसतो.
आपल्यालाही त्या माणसासारखा पुर्ण तलाव प्यावासा वाटतो आणि आपण त्याचा विचारच करत बसतो, कारण ते काम खुपच मोठ असतं कदाचित आापल्या आवाक्याबाहेरच असते असं म्हण्टल तरी चालेल. नाही का? पण बऱ्याचवेळा आपल्या सगळ्यांना माहीत असलेला एक नियम विसरून जातोत, आपण विसरतोत की आपण जर तेच मोठ काम खुप लहान लहान हिस्यांमध्ये करायला सुरवात केलि तर अपण पुर्ण केलेल्या प्रत्येक छोट्याशा हिस्यासोबत आपलि क्षमता आणि आत्मविश्वास वाढत जाणार आहे.  मला इतकचं म्हणायचे आहे की आपण जर आपलि मोठमोठालि कामे जी कित्येक दिवसांपासून आपल्या आवाक्याबाहेर असल्यामुळे फक्त एक विचारच बनुन राहिलेलि आहेत त्या कामांना लहान लहान हिस्यात तोडुन आपल्याला जसे जमेल तसे, हळू हळू पुर्ण करायला सुरवात केलि तर जमणार नाही का? अर्थात वेळ तर लागणारच आहे पण किमान जी कामे कित्येक दिवसांपासून अडून राहीलेलि आहेत ती कामे एक एक करत सुरू तर होतिल, नाहि का? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते काम खुप मोठे असल्याचा ताण सुध्दा आपल्याला त्यामानाने कमी होईल.
एक लहानस उदाहरण घेऊयात आपण एखाद पुस्तक वाचायच म्हंटल क‍ि बहुतेक वेळा त्या पुस्तकाचा असलेला मोठा आकार पाहुनच नंतर कधितरी वेळ मिळाला की वाचू असं म्हणून सोडून देतो, नंतर आपल्या अस लक्षात येते कि यार आपल्याला हे पुस्तक वाचायचे आहेरे पण एवढ मोठ पुस्तक कधि वाचून पुर्ण होणार अस म्हणता म्हणता कित्येक महिने उलटून गेलेले आहेत तरी आपल ते पुस्तक काही वाचून झालेले नाही, कारण आपल्याला तेवढा वेळच मिळालेला नाही. पण आपण विसरुन जातो कि ते पुस्तक सुध्दा एक एक पानांचच बनलेले आहे आणि तसही आपण एका वेळी एका पानावर लिहिलेलेच वाचू शकतो. ते पुस्तक एकाचवेळी पुर्ण वाचण्याचा विचार आपण थोडासा बाजूला ठेवला आणि रोज फक्त २० पाने वाचायला सुरवात केलि तर अगदि ६०० पानि पुस्तक देखिल एका महिन्यात आपल वाचून होईल तसच आपल्या इतर कामांचेसुध्दा आहे. नाही का?
अर्थात हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे कि त्याला त्याचे प्रत्येक काम कसे करायचे आहे. पण करूया कधितरी अस म्हणुन काम टाळण्यापेक्षा लहान लहान हिस्यांमध्ये पुर्ण करणे कधिही जास्त चांगले.
तुमच मत काय आहे?  हे मला Comment करून सांगायला विसरू नका.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा