मुख्य सामग्रीवर वगळा

किमयागारांचे गणित

पिकासो… खुप कमी लोक असतिल ज्यांने पिकासोचे नाव सुध्दा ऐकले नसेल. पिकासो हा मागच्या शतकातिल.. खर तर आजपर्यंत झालेल्या महत्वाच्या आणि जिनियस पेंटरस पैकि एक महत्वाचा पेंटर, तर तो एकदा प्रवासादरम्यान एका लहानशा गावात थांबला होता तस त्या गावकऱ्यापैकि कोणी त्याला ओळखेल याची शक्यता थोडीशी कमीच पण तो ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला होतो तिथे असणाऱ्या एका महिलेने पिकासो ला ओळखले व एकदा सहज गप्पा मारता मारता तिने पिकासोकडे तिच्यासाठी एखदी पेंटिग बनवावि असा हट्रट धरला, त्यावर पिकासो म्हणाला कि सध्या मी प्रवासात आहे त्यामुळे माझ्याकडे पेंटिंग करण्यासाठी सामग्री नाही आहे, मी नंतर कधितरी नक्की तुमच्यासाठी पेंटिग बनवेल..

यावर ती महिला पिकासोला म्हणालि कि तुमच्यासारख्या व्यस्त माणसाची परत कधि भेट होईल कि नाही माहित नाही त्यामुळे प्लिज माझ्यासाठी तुम्हि आत्ताच एखादी पेंटिग बनवा मी तुमची खुप मोठी चहाती आहे. यावर पिकासोने हॉटेलच्या काऊंटर वरुन एक कागद आणि पेन घेऊन अवघ्या २० मि. मध्येच एक चित्र् रेखाटले. काहि क्षण विचार करुन ते चित्र त्या महिलेच्या हातात देत देत म्हणाले कि याची किमंत असेल १ मिलियन डॉलर. त्या महिलिने ते चित्र बघितल्यावर काहि न कळल्यामुळे कळल्यावर ती पिकासोला म्हणालि महाशय तुम्हि नक्किच माझी मस्करी करत आहात कारण तुम्हि हे चित्र अवघ्या २० मि. मध्ये माझ्या डोळ्रयादेखत बनवल आहे आणि तुम्हि याची किंमत सांगताय चक्क १ मिलियन डॉलरस..

यावर पिकासोने हसुनच ऊत्तर दिले कि हव तर तुम्हि बाजारात जाऊन चौकशी करून येऊ शकता पुढचे ५ – ६ दिवस तरी मी या गावातच आहे. यावर ती महिला चित्र घेऊन निघुन गेली. दोन दिवसांनी ती महिला पिकासोला येऊन म्हणालि कि खरतर मला तुम्हच्या म्हणन्यावर अजिबात विश्वास न्हवता त्यामुळे या चित्राची किंमत जाणुन घेण्यासाठि मी शहरात गेले होते आणि तिथे हि मला जाणकारांने या चित्राची किंमत जवळपास १ मि. डॉलरस इतकिच सांगितलि, पण मि. पिकासो हे कस शक्य आहे हे चित्र काढायला तुम्हाला केवळ काही मिनिटेच लागले होते हो काय प्रकार आहे,, मलाही तुमच्या सारखे चित्र काढायला शिकवाल काय मला खात्रि आहे मी मिलियन डॉलर नाही पण किमान काही हजार डॉलर ची पेंटीग किंवा चित्र काढायला नक्कीच शिकेल.

यावर पिकासोने हसुन त्या महिलेला विचारले कि, किती वेळ लागला म्हणाले तुम्हि मला ते चित्र काढायला? साधारण पणे २० मिनिटे. ती महिला म्हणालि.

नाहि… ते मिलियन डॉलरचे चित्र विस मिनिटांमध्ये काढायला मला अथक परीश्रमांचे आणि सरावाचे विस वर्ष लागले आहेत.

रामानुजन एकादा ६ थी ७ वी मध्ये एक अधिकारी इन्स्पेकशन साठी त्याच्या शाळेत आला त्याने रामानुजनच्या कुशाग्र्‍ बुध्दिमत्तेची ख्याती ऐकलेलि होती. त्याने रामानुजनच्या वर्गात आल्यावर एक गणिते कोढे विचारले, ते कोढे असे होते कि समजा एका वर्गात १ ते १०० असे पट क्रमांक असणारे १०० विद्यार्थी आहेत,  मला त्यांना त्यांच्या क्रमांकाप्रमाणे पैसे द्यायचे आहेत म्हणजे ज्याचा क्रमांक १ आहे त्याला १ रुपाया ज्याच्या क्रमांक २ आहे त्याला २ आहे त्याला २ रुपये असे १०० विद्यार्थी आहेत, तर मला किती रुपये आणावे लागतिल? त्यांचा प्रश्‌न संपतो न संपतो तेवढ्यात रामानुजनने उत्तर दिले तुम्हाला ५०५० रुपये आणावे लागतिल.

एक भाकरी बनवायला अंदाजे किती कष्ट लागतात? हो.. हो.. मला माहिती आहे की विषयांतर होत आहे पण तरीही…. किती कष्ट लागतात एका भाकरीला बनवण्यासाठी?

शाळेत असताना मी एक कष्टाची भाकर नावाचे एक लहानसे पुस्तक वाचले होते पुस्तकाचा सारांश असा कि आपल्याला वाटत कि भाकरी काय ५ १० मिनिटांमध्ये तयार होते. बरोबर ना? ज्या धांन्या पासुन ती भाकरी बनवलि आहे ते धांन्य पिकवण्यासाठी, ते आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी, धांन्य दळून त्याच पिठ करण्यासाठी किती वेळ आणि कष्ट लागले आहेत याचा आपण विचार करतो का? अर्थात या आपण मध्ये मी सुध्दा येतोच, त्यात काही वाद नाही. पण तसेच आपण इतर गोष्टींकडे सुध्दा बघतो असे नाही वाटत का तुम्हाला? म्हणजे बघाना शंकरमहादेवन, अरीजित सिंग यांचे मंत्रमुग्ध करणारे गाणे ऐकले कि आपण कित्येकवेळा सहजपणे म्हणुन जातो काय आवाज आहे यार…. असा आवाज्‍ माझा असता तर मी आज त्यांच्या जागि असतो. किंवा कित्येक क्रिकेटरचे काहि शॉट्स बघुन आपण म्हणतो की यार किती एफर्टलेसलि शॉट मारला यार त्याने…. पण खरचं तो शॉट दिसतो तितका एफर्टलेसलि मारलेला असतो का? नक्कीच नाही. त्या एका शॉट मागे अगणित सराव असतो. एखाद्याचे यश बघुन आपण कित्येकवेळा म्हणतो कि यार नशिब लागत अस यश मिळायला अर्थात नशिबाचा यात किती वाटा आहे हा आपला मुद्दा नाहीये पण ज्या वेळी आपण अस म्हणतो त्या वेळी आपण त्या व्यक्तिने केलेल्या मेहनतिचा विचार करतो का?
मराठीमध्ये एक म्हण आहे की, दुरून डोंगर साजरे. मला ती म्हण किमान एखाद्या व्यक्तिच्या यशाबद्दल सुध्दा खरी वाटते.

बघाना.. त्या महिलेला असे वाटले कि पिकासोला मिलियन डॉलर किंमत असणारे चित्र काढायला फक्त पण काही मिनिटे लागले, पण प्रत्यक्षात मात्र ते चित्र २० मिनिटांमध्ये काढाण्याच्या लायक व्हायला पिकासोला २० वर्षाहून अधिक काळ लागला. एक प्रकारे ते जर बघितले तर ते चित्र काढालया पिकासोला खरचं २० वर्षांपेक्षा जास्त काळ लागला. नाहीका?

रामानुजनला अधिकाऱ्याने दिलेले काढे सोडवायला अवघे काही क्षणच लागले, पण ते कोढे काही क्षणात सोडवण्यासाठी लागणारी अंकांची समज विकसित करायला किती वेळ आणि सरावाची गरज पडलि असेल? अर्थात, गणित साडविणे हे रामानुजनच्या स्वभावाचाच एक भाग होता पण यामुळे त्याला गणिताचा सराव करायला लागणाऱ्या मेहनतिची काहीच किंमत नाहीका?

एक भाकरी बनवण्यासाठी खरच काही मिनिटेच लागतात का? विचार करण्या सारखि गोष्ट आहे.. बरोबर?

चला एक थोडस आपल्याशी संबंधित असणारे उदाहरण घेऊया. तुम्हाला ही पोस्ट वाचायला किती वेळ लागला? कदाचित दोन ते पाच मिनिटांच्या आसपास. पण तुमच्या या दोन ते पाच मिनिटांमध्ये तुम्ही लहानपणी केलेल्या बारखड्यांच्या उजळण्यांचा काहीच हात नाहीका?

शेवटी प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो, त्यामुळे आपले विचार जुळतिलच हे गरजेचे नाही पण आजच्या पोस्टवर आपण विचार करावा हा आग्रह करण्याची ईच्छा नक्किच माझि…

तुमचे मत काय आहे यावर मला Comment करून कळवायला विसरू नका…


टिप्पण्या