मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

व्यक्त मन - भाग १

  असे म्हणतात कि माणसाच्या मनात एका दिवसात जवळ पास ७० ते ८० हजार विचार येतात, आणि त्यातले बहूतेक विचार हे नकारात्मक किंवा असे असतात जे आपल्या काही कामाचेच नसतात. हिंदी मध्ये एक म्हण आहे “खालि दिमाग शैतान का घर” पण जर एखाद्याच्या डोक्यात बिनाकामाचे किंवा नकारात्मक किंवा नकोसे असणारे विचारच प्रमाणा बाहेर असतिल तर त्याच काय? अशा माणसाचे डोके सुध्दा काही शैतानाच्या घरापेक्षा कमी नाही, बरोबर ना? माणसाच्या अंतरमनाच्या शक्तिला आपण खुपच कमी लेखतो, स्वामि विवेकानंद आणि त्यांच्यासारख्या अनेक महान माणसांनी आपल्याला वेळोवेळी विचांरांचे आणि मानवि मानाच्या शक्तिचे महत्व सांगितलेले आहेच तरी आपण सगळेच त्याकडे दुर्लक्ष करतो. अर्थात विचारांवर नियंत्रण ठेवणे म्हणजे काही खायची गोष्ट नाहीये पण आपल्याला आपले विचार नियंत्रित नाही करता येत, आणि आपण शांत एका जागेवर बसुन अस तर नाही म्हणु शकत कि आता मी काहीच विचार करणार नाही. आधि तर तसा प्रयत्न आपल्या सारख्या सामान्य माणसाने करणे एकप्रकारे हास्यास्पदच आहे. असो. ईतक काही सांगायचा मुख्य मुद्दा असा कि आता corona असल्यामुळे वातावरण खुपच नकारात्मक झालेल आहे, बा