मुख्य सामग्रीवर वगळा

व्यक्त मन - भाग १

 

असे म्हणतात कि माणसाच्या मनात एका दिवसात जवळ पास ७० ते ८० हजार विचार येतात, आणि त्यातले बहूतेक विचार हे नकारात्मक किंवा असे असतात जे आपल्या काही कामाचेच नसतात. हिंदी मध्ये एक म्हण आहे “खालि दिमाग शैतान का घर” पण जर एखाद्याच्या डोक्यात बिनाकामाचे किंवा नकारात्मक किंवा नकोसे असणारे विचारच प्रमाणा बाहेर असतिल तर त्याच काय? अशा माणसाचे डोके सुध्दा काही शैतानाच्या घरापेक्षा कमी नाही, बरोबर ना?

माणसाच्या अंतरमनाच्या शक्तिला आपण खुपच कमी लेखतो, स्वामि विवेकानंद आणि त्यांच्यासारख्या अनेक महान माणसांनी आपल्याला वेळोवेळी विचांरांचे आणि मानवि मानाच्या शक्तिचे महत्व सांगितलेले आहेच तरी आपण सगळेच त्याकडे दुर्लक्ष करतो. अर्थात विचारांवर नियंत्रण ठेवणे म्हणजे काही खायची गोष्ट नाहीये पण आपल्याला आपले विचार नियंत्रित नाही करता येत, आणि आपण शांत एका जागेवर बसुन अस तर नाही म्हणु शकत कि आता मी काहीच विचार करणार नाही. आधि तर तसा प्रयत्न आपल्या सारख्या सामान्य माणसाने करणे एकप्रकारे हास्यास्पदच आहे. असो.

ईतक काही सांगायचा मुख्य मुद्दा असा कि आता corona असल्यामुळे वातावरण खुपच नकारात्मक झालेल आहे, बातम्या वगैरे मध्ये सुध्दा सतत तेच चालु आहे, covid इतकी लोकं दगावलि तितकी लोंक आजारी आहेत वगैरे वगैरे. लोंकांच्या बोलण्यातही दुसरा कोणता मुद्दा नसल्या सारखेच झाले आहे. त्यामुळे होत काय आहे? तर आपण खुपच घाबरत आहोत अर्थात मी अस नाही म्हणत आहे कि काही corona वगैरे नाही उगाच काही तरी राजकारणासाठी किंवा व्यापारा साठी चालु आहे वगैरे. राजकारण आणि व्यापार हाही त्यातला मुद्दा असु शकातो पण आपण त्यावर न बोललेलेच बरे, corona गंभ्रिर आजार आहे आणि त्या अनुषंगाने आपण सर्वांनिच आपआपलि काळजी घेतलि पाहीजे त्यात काही वाद नाही पण आपण विचार आणि त्याच्या प्रभावावर बोलत होतो तिथेच वळु.

तर मनवि मनात खुप विचार येतात आणि त्यातले पुष्कळ विचार नकारात्मक किंवा बिनकामाचे असतात इथ पर्यंत तर आपण आलोत आणि आपण आपले विचार काही केल्या थांबवु शकत नाही हे तर कळाल पण याच करायच काय? नकारात्मक विचार कसे घालवायचे? तर उत्तर जास्त अवघड नाहीये सोपच आहे आपल्याला फक्त इतकच करावे लागेल कि आपल्या मनाला काही तरी काम द्यावे लागेल माणसाच्या मनाची तुलना एखद्या चंचल माकडाशि करण्यात येते, जे काही शांत बसायला तयार होत नाही पण या माकडाची एक अडचण आहे हे माकड एक सोबत अनेक काम करु शकत नाही, ईथे लक्ष देऊन अनेक काम करण्या बाबत मी बोलत आहे नाही तर कोणी म्हणेल की काहीही काय सांगता आम्ही तर कित्येक काम एकत्रपणेच करतो जसे कि जेवता जेवता टिव्ही पाहणे वगैरे रोज करतो त्यात तर आम्हाला काही अडचण येत नाही, असो तर आपण आपल्या मनाला या सगळ्या कोलाहला पासुन दुर ठेवण्यासाठी काही तरी काम द्यायला पाहीजे.

मला कधि कधि आश्चर्य वाटते कि जगातल्या प्रत्येक संस्कृति मध्ये कदाचित अशाच गोष्टिंचा विचार करुन तर नामस्मरण प्रार्थना वगैरे बद्दल सांगितले नसेल ना?

मला चांगल आठवतय मी शाळेत असताना आमच्या शाळेत प्रार्थना वगैरे घ्यायचे, घरी आलो की आई दिवे लागणिच्या वेळी शुभं करोति आणि असेच काही स्तोत्रे म्हणायला लावायचि, आजोळी गेल्यावर तर अगदी आरत्या सुध्दा पाठ करुण म्हणाव्या लागत असत. मला हे नाही माहीती कि त्यातुन कोणी देवता प्रसन्न होत असेल की नाही पण एक नक्की त्या सगळ्या आरत्या स्तोत्रे आणि प्रार्थनांमुळे घरातले वातावरण नक्कीच प्रसन्न व्हायचे आणि त्याच प्रसन्नतेची आपल्याला आज या संकट प्रसंगी गरज आहे. देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी नका का नसाना पण त्या सगळ्यां स्तोत्र – प्रार्थना वगैरेंचा वापर आपण आज या धावपळीच्या आणि दिवसें दिवस तणावमय होत चाललेल्या आयुष्यात मनाची प्रसन्नता मिळवण्यासाठी आणि त्या अतिचपळ मानवि मन रुपी माकडाला दिवसातुन थोड्या वेळे साठी का होईना निवांत बसवण्यासाठी नक्कीच करु शकतो.

मी फक्त मला सुचलेले विचार मांडले आहेत बाकी आपल्या भल्याचा विचार करायला आपण सगळेच समर्थ आहोत.

आपल्याला माझि ही पोस्ट कशी वाटलि किंवा आपले या संदर्भात काय वाटते हे comment करुन सांगायला विसरु नका…

टिप्पण्या

  1. खुप चांगली माहीती आपण लोकास पूर्वत आहात त्याबद्दल धन्यवाद / तुम्ही आमचा ब्लॉग ही पाहू शकतात माझी नोकरी

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा