First Ad

व्यक्त मन - भाग 2 ध्यान

आज थोड मनातल बोलणार आहे. थोडा स्वत:चा अनुभव थोड पुस्तकी अशी सगळ्यांची सरमिसळ करुण. आजची पोस्ट तुम्हाला सगळ्यांना आवडेल ही अपेक्षा करतो. आपण सगळ्यांनी कोणत्याही प्रकारचा पुर्वाग्रह न धरता ही पोस्ट वाचावि आणि आपल मत किंवा अनुभव मला नक्की कळवावा अशी मी विनंती करेल. तर नक्की कोठुन सुरवात करायची बरं? तर आपल्या भारतात ध्यान या गोष्टीला खुप मोठ माणल जात, म्हणजे ध्यान करण्यासाठी आपल्याला सन्यास घ्यावा लागतो कींवा ध्यान ही म्हतारपणी करण्याची बाब आहे इत्यादी इत्यादी… बरोबर ना? अर्थात मी काही गहन प्रश्नांना सामोर नाही जाणार आपल्या आजच्या सवांदामध्ये जस कि who am i? self-discovery वगैरे वगैरे अर्थात ज्यांना हा प्रश्न पडत असेल त्यांचा भाग वेगळा पण आज मी ध्यान करायला कशी सुरवात केली? याबद्दल सांगणार आहे. शेवटी हा अनुभवाचा भाग आहे पण तरीही काही गोष्टी नसतात का ज्यांच्या बद्दल आपल्याला उत्सुकता असते त्यातलि आपलि ही एक उत्सुकता. आपल्या भारतिय संस्कृती मध्ये ध्यानाचे प्रकार आपल्या दैनंदिन आचरनात आहेत उदाहरणार्थ रोज पुजा करणे नामस्मरण करणे इ. कधि कधि म्हणाव वाटत की जस पाश्चात्य देशांनी अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानावर शोध केले तसे आपल्या संस्कृती मध्ये ध्यान आणि गणित या दोन विषयांबद्दल खुप संशोधन झालेल आहे (इथे मी अस म्हणत नाहीये की भारताने प्राचिन काळापासून फक्त या दोन विषयांमध्येच संशोधन केले. भारताने कोणकोणत्या विषयांवर खुप संशोधन केले या विषयावर आपण नंतर कधि तरी येऊ. मी कोणी त्यातला जाणकार सुध्दा नाही)नक्की सांगायच झाल तर माझि पारंपारीक ध्यानाची ओझरती ओळख झालि ती मी आठवि मध्ये असताना. आमच्या मराठी च्या मॅडम ने आम्हाला रविवारच्या एका दिवसाच्या ध्यान शिबिरासाठी नेल होत. ती होती माझि पहिलि ओळख ध्याना सोबत, त्यानंतर मग जस लहानपणी असते नव्याचे नऊ दिवस तसच माझही ध्यानाच्या बाबतित झाल हालाखि त्यावेळी मी देव - राक्षस वगैरे अशा गोष्टी मानायचो तो पर्यंत भगवद्गीता सुध्दा वाचुन झालेलि होती अर्थात त्यातल मला काही कळाल होत अस नाही फक्त एक धार्मिक पुस्तक आणि थोडीशी उत्सुकता यामुळे वाचलि होती मराठीत भाषांतरीत भगवद्गीता. असो, त्यानंतर अकरावि मध्ये मी थोडेफार योगासन वगैरे शिकलो त्याच वेळेस अष्टांग योग बद्दल काही प्राथमिक पुस्तकेसुध्दा वाचलि, विवेकानंदावर लिहलेलि काही मराठी आणि हिंदी पुस्तके,कादंबरी देखिल याच दरम्यान मी वाचले या सगळयांचा व्हायचा तो परीणाम माझ्यावर झाला माझि ध्याना बद्दल उत्सुकता जागी झालि आता यावेळी त्यात मी ध्यान परत चालु केलं. आता पाठीमागे वळुन पाहील्यावर लक्षात येत की त्यावेळी ध्यानधारणा केली त्यामागे कुठेना कुठे वाचलेल्या शक्तिं बद्दल सिद्धिबदृल आकर्षण सुध्दा होत. मला माहीती नाही अशा काही शक्ति वगैरे असतात की नाही पण मी मानतो की त्यावेळी केलेल्या ध्यानाने मला माझ्या वडीलांच्या मृत्युच्या धक्यातुन बाहेर पडायला खुप मदत केलि. आता यावेळेसही माझ्या ध्यान करण्यामागे काही ना काही लालसा असल्यामुळे असाव कदाचित यावेळी सुध्दा लवकरच माझि ध्यानयात्रा संपलि. यानंतर माझा ध्यानाचा अनुभव खऱ्या अर्थाने ध्यानाचा अनुभव म्हणाव लागेल कारण आताच्या वेळी मी पध्दतशिर पणे ध्यान शिकलो. त्याच झाल अस की 2018 मध्ये मी विपश्यना शिबिरा मध्ये दहा दिवसांसाठी गेलो. आता विपश्यनाच का? तर मी संदिप महेश्वरींचा ध्यानासंबंधित video पाहीला आता परत एकदा माझि ध्याना बद्दलची उत्सुकता चाळवलि गेलि आता यावेळी मात्र फक्त उत्सुकता होती तर मी इंटरनेट वर पाहुन पाहुन ध्यानाचा प्रयत्न करायला लागलो पण ते काही मला जमेना काही दिवस प्रयत्न केला तरी मला काही ध्यान करता येईना आणि ते असतना एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल तेव्हा आपण आणखीन त्याच्या मागे तसच माझ झाले उत्सुकता तर खुप आणि त्यातल्या त्यात उन्हाळ्याच्या सुट्टया म्हणजे मी रीकामाच दुसर काही करायला नाहीच टि.व्ही तरी कीती पाहणार. म्हणुन मी मला पध्दतशिरपणे ध्यान कुठे शिकता येईल याच्या शोधात होतो. मी परत इंटरनेवर शोधायला चालु केल काही Paid courses बद्दल मला माहीती मिळालि पण माझ्याकडे पैसा नव्हता आणि या कामासाठी मला घरून पैसा मिळणार नव्हताच. कुठेना कुठे तो आठवि मधला एक दिवसाचा अनुभव मला खुणावत होता त्यात माझ्या भावाने सुध्दा विपश्यना (Vipassana) च शिबिर पुर्ण केल होत. त्यानेही मला एक दोन वेळा सांगितल होत पण मी कधि लक्ष दिल नव्हत. अस नव्हते की मला त्यात रस नव्हता पण ध्यान वगैरे मी परत इतक सिरीयसलि घेतल नव्हत शिवाय त्याला तिथे जायला पैसे लागतात का या बद्दल सुध्दा मी कधि विचारले नव्हते. तर आमच्या घरापासुन जवळपास अर्ध्या तासाच्या पायी अंतरावर विपशना केंद्र असल्यामुळे आणि आठवित एकदा तिथे गेलेलो असल्यामुळे मी सहज एकदा विचारुन पहाव या भावनेने तिथे जाऊन विचारपुस केलि. अस नव्हते की ध्यान करायचे सोडल्या नंतर मला विपश्यना करावि नाही वाटली पण त्यात ईतका रस उरला नव्हता म्हणून मी काही खास लक्ष दिले नाही. आत तिथे जाऊन विचारपूस केल्यानंतर कळाल की दहा दिवसाच्या शिबिरात राहणे, खाने सगळ मुफ्त आहे त्यामुळे पैशांचा प्रश्न नव्हता त्यामुळे मी शेवटी विपश्यना शिबिरात जाऊन आलो. तो वेगळाच अविस्मरणीय अनुभव आहे. 

मी सगळ्यांना एकदा दहा दिवस वेळ काढून विपश्यना शिबिर पुर्ण करायची शिफारस नक्कीच करेल. तुम्ही कोणत्याही धर्माचे पालन करता याच्याशि विपश्यनेचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे आपण सर्वांनी एकदा तरी विपश्यना शिबीर पुर्ण कराव असा मला आग्रह करावा वाटतो. Meditation किंवा ध्यान हे काही फक्त आध्यात्मिक उन्नतीचे साधन आहे असे नाही तर ध्यानाचे कीत्येक दैनंदिन जीवनात सुध्दा फायदे आहेतच, शिवाय ताण - तणाव, आयुष्याबद्दल आलेली निरसता यांच्यावरही ध्यान करण्याने फायदा नक्कीच होतो. जसा आपल्या शरीराला चांगला आहार आणि व्यायाम वगैरे मुळे लाभ होतो तसच ध्यान आपल्याला मानसिक स्वास्थ्य मिळवण्यात मदत करतं. आणि इतक्या तणावपूर्ण आयुष्यात जी विश्रांती आपल्याला ध्यानाने मिळू शकते ती मिळवण्यासाठी आपण नक्कीच दिवसातून विस पंचवीस मिनिटे ध्यान करायला हरकत नाही. बरोबर ना?

येणाऱ्या काही पोस्ट मध्ये आपण ध्यानाचे फायदे व काही सोप्या पध्दतीं बद्दल जाणून घेऊया.


आपल्याला ही पोस्ट कशी वाटली हे कळवायला विसरू नका. आपल्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत...! 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या