मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ध्यानाचे फायदे

ध्यान का करायला पाहीजे? (why everyone should meditate?) कींवा ध्यानाचे फायदे काय आहेत या बद्द्ल आपण थोडी चर्चा करणार आहोत.  आजकाल आपले जीवन खुपच धावपळीत चालले आहे, आपला दिवस घर - काम - घर आणि उरलेला वेळ मनोरंजनात व परीवार या सगळ्याचा विचार करण्यातच जातो यामुळे होत काय आहे की आपल्या मनावर येणारा ताण खुपच वाढत आहे, आपल्याकडे स्वत:साठी काही वेळ नाहिये. आपला दिवस भराचा वेळ कुठे निघून जातोय हे आपल्यालाच लक्षात येत नाही. आपण स्वतःला देखील वेळ देत नाही. बर ते जाऊ द्या आपण ध्यानधारणा करण्याचे काही फायदे कींवा benefits of meditation यावर चर्चा करूया ध्यान करण्याचे फायदे :- 1) मन शांत होते :- आपला मेंदू हा एखाद्या कथाकारा प्रमाणे असतो, आपले विचार आपला दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी आपण आपल्या नकळतपणे आपल्या सोयीनुसार समजून घेत असतो आणि पहायला गेलं तर त्यात किही चुकीचे नाही पण कित्येकवेळा आपल्या मनाची विनाकारण बडबड चालू असते. आजकाल तर प्रमाणाबाहेर विचार करण्याला ट्रेंड मानल जाते पण एकदा या पद्धतीने विचार करून पहा. अस समजा तुमच मन ही स्वतंत्र व्यक्ती आहे आणि सदैव तुमच्या सोबत असते. ती व

Social media वरील निवडक पोस्ट्स - प्रमाण

ही कृष्णाजी नारायण आठल्ये यांची "प्रमाण" नावाची कविता आहे. आठवणीतील कविता यात ती वाचायला मिळतात. स्वातंत्र्यपूर्व काळात ती सर्वाची तोंडपाठ होती. 'केरळकोकीळ' ही त्यांना उपाधी होती. 'सासरची पाठवणी' ही त्यांची आणखी एक अजरामर कविता. मराठी विश्वकोश, मराठी चरित्रकोश, आठल्ये घराण्याचा इतिहास यात अधिक माहिती उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी अवश्य पहावी. अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे  २० रत्ने आहेत...........           अतीकोपता कार्य जाते  लयाला,  अती नम्रता पात्र होते भयाला । अती काम ते कोणतेही नसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।। अती लोभ आणी जना नित्य लाज, अती त्याग तो रोकडा मृत्य आज । सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।। अती मोह हा दु:ख शोकास मूळ,  अती काळजी टाकणे हेही खूळ । सदा चित्त हे सद्विचारे कसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।। अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया, अती खेळणे हा भिकेचाच पाया । न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।। अती दान तेही प्रपंचात छिद्र,  अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।