मुख्य सामग्रीवर वगळा

ध्यानाचे फायदे

ध्यान का करायला पाहीजे? (why everyone should meditate?) कींवा ध्यानाचे फायदे काय आहेत या बद्द्ल आपण थोडी चर्चा करणार आहोत. 
आजकाल आपले जीवन खुपच धावपळीत चालले आहे, आपला दिवस घर - काम - घर आणि उरलेला वेळ मनोरंजनात व परीवार या सगळ्याचा विचार करण्यातच जातो यामुळे होत काय आहे की आपल्या मनावर येणारा ताण खुपच वाढत आहे, आपल्याकडे स्वत:साठी काही वेळ नाहिये. आपला दिवस भराचा वेळ कुठे निघून जातोय हे आपल्यालाच लक्षात येत नाही. आपण स्वतःला देखील वेळ देत नाही. बर ते जाऊ द्या आपण ध्यानधारणा करण्याचे काही फायदे कींवा benefits of meditation यावर चर्चा करूया


ध्यान करण्याचे फायदे :-
1) मन शांत होते :- आपला मेंदू हा एखाद्या कथाकारा प्रमाणे असतो, आपले विचार आपला दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी आपण आपल्या नकळतपणे आपल्या सोयीनुसार समजून घेत असतो आणि पहायला गेलं तर त्यात किही चुकीचे नाही पण कित्येकवेळा आपल्या मनाची विनाकारण बडबड चालू असते. आजकाल तर प्रमाणाबाहेर विचार करण्याला ट्रेंड मानल जाते पण एकदा या पद्धतीने विचार करून पहा. अस समजा तुमच मन ही स्वतंत्र व्यक्ती आहे आणि सदैव तुमच्या सोबत असते. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक घटनेवर काही ना काही comment करत आहे ती व्यक्ती काही बोलायचे थांबत नाही सतत काहीतरी बडबड चालुच असते तर अशा व्यक्तीला तुम्ही कीती वेळ सहन कराव? बर ते सुद्धा जाऊदे मी तुम्हाला तुमची विचारक्षमता कमी करण्यासाठी सागत नाहीये पण वैज्ञानिक अस म्हणतात कि माणसाच्या मनात दर दिवशी जवळ जवळ 60 - 70 हजार विचार येतात आणि त्यातून बहुतेक विचार हे बिनकामाचे आणि नकारात्मक असतात आता मला सांगा ईतका विचार करण्यासाठी काही ना काही ऊर्जा तर खर्च होत असेल, बरोबर? मग आता याच उर्जेची थोडी ऊर्जा आपण जर आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींचा विचार करण्यात वापरलि तर त्या विचारांमध्ये किती ताकद असेल बर... ईथे मी थोडक्यात हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की शांतपणे केलेला विचार हा बहुतांशी आपल्या मनात सहजपणे आलेल्या विचारापेक्षा नक्कीच सखोल आणि ठाम असेल नाही का? हिच शांतपणे, अभ्यासपूर्ण आणि सखोलपणे विचार करण्याची आपली क्षमता ध्यान केल्याने वाढते ज्यामुळे आपले विचार, आपले निर्णय जास्त अचूक कींवा ठाम बनत जातात.

2) एकाग्रता आणि धारणा शक्ति वाढते :- हल्ली आपल्या जीवनशैलीमुळे आपली एकाग्रता कमी व्हायला लागली आहे हे तुम्ही अनुभवले असेलच. स्वामी विवेकानंद म्हणतात की यशस्वी माणसामध्ये आणि अयशस्वी माणसामध्ये फक्त एकाग्रतेचा फरक
असतो.
आपण धारणा शक्ती आणि एकाग्रते मधला फरक समजून घेऊया. एखादी गोष्टं किंवा घटना आपण आपल्या मनात किती वेळ धरून ठेऊ शकतो ही क्षमता म्हणजे आपली धारणाशक्ती आणि एखाद्या गोष्टीचे आकलन किंवा अनुसरण लक्ष विचलित होऊ न देता करण्याची क्षमता म्हणजे एकाग्रता. थोडक्यात काय तर एखाद्या ठिकाणी मन लावण्यासाठी लागणारी क्षमता म्हणजे धारणा आणि लावलेले लक्ष पाहिजे तोपर्यंत विचलित होऊ न देण्याची क्षमता म्हणजे एकाग्रता. बरोबर आहे ना?

3) वर्तमानात घडणाऱ्या घटनांबद्दल जागरूकता वाढते :- आपल्या मनाला भटकण्यासाठी फक्त दोनच जागा असतात एक म्हणजे कल्पना आणि दुसरी जागा म्हणजे भुतकाळ, म्हणजे आपले मन एकतर भविष्य काळाबद्दल कल्पना करत असते की आपण हे झाल तर हे करू, ते झाल तर ते करू, अस झाले तर असे करू नाहीतर आपण भुतकाळात रमुन जातो. जुन्या चांगल्या वाईट आठवणी, या दोन गोष्टींचा विचार करण्यातच आपलि अधिकतर मानसिक शक्ति खर्च होत असते. आता भुतकाळ आणि भविष्य काळाच्या गोष्टीचा विचार जर योग्य त्या प्रमाणात असेल तर त्यात काही गैर नाही पण अडचण ही आहे की आपण आपल्या सगळ्या विचारांबद्दल सजग नसतो पण जसे वर सांगितल्याप्रमाणे ध्यान करण्याने आपले मन दिवसेंदिवस अधिकाधिक शांत व्हायला लागते म्हणजे आपण भुतकाळ आणि भविष्याबद्दल कमी विचार करतो आणि जर आपण भुतकाळात रमलेलो नाही आहोत आणि भविष्याच्या कल्पनांमध्ये गुंतलेलो नाही आहोत तर आपल्या मना साठी फक्त एक जागा शिल्लक राहते ती जागा म्हणजे आपला वर्तमान काळ, त्यामुळे आपण वर्नातमानात चालु असलेल्या घटनांबद्दल आपण अधिक जागरूक राहतो, बरोब्बर आहे की नाही?

4) ताण तणाव कमी होतो :- आपल्या मनावर ताण कधी येतो? ज्यावेळी आपण काय भुतकाळाचे ओझे वाहत असतो तेव्हा म्हणजे अस का झाल? हे नव्हतं व्हायला पाहिजे. अस माझ्या सोबतच का होते? अशा प्रकारचे विचार आपल्या मनात अधिक काळ घर करून बसतात तेव्ह कींवा त्यावेळी ताण येतो ज्यावेळी आपण उद्या काय होईल? जर मी हे केल तर? कींवा जर माझ्यासोबत असे झाले तर मी काय करू वगैरे वगैरे या दोन्ही स्थितीत आपल्या मनावर ताण येतो. अर्थात मी ईथे फक्त काही उदाहरणे दिली आहेत ताण तणावाचे प्रत्येक व्यक्ती साठी ईतर कारणे असू शकतात त्याबद्दल काही वाद नाही,आणि मला असेही म्हणायचे नाही की आपल्या मनात भुतकाळाचे कींवा भविष्याबद्दलचे विचार येणे चुकीचे आहे मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की गेलेल्या वेळेचा आणि येणार्‍या वेळेचा प्रमाणापेक्षा जास्त विचार आपल्या मनावर ताण आणतो आणि तो ताण ध्यान केल्यामुळे कमी होतो कारण ध्यान आपल्या मनाला वर्तमान काळात राहण्यास आणि विनाकारण विचार न करण्यास मदत करते.

5) स्वतः सोबत ओळख वाढते :- मला सांगा आपण एखाद्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे ओळखायला कधी लागतो? ज्यावेळी आपण त्या व्यक्ती सोबत वेळ घालवतो कींवा आणखी चांगल्या पध्दतीने सांगायचे तर जेव्हा आपण आपला वेळ एखाद्या व्यक्तीला देतो त्या व्यक्तीच्या विचारांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपलि त्या माणसासोबत ओळख वाढते. बरोबर का नाही?
आपण ध्यानात सुध्दा हेच करतो शांत मनाने स्वतःच्या विचारांचे निरीक्षण करायला शिकतो, स्वतःच्या विचारांबद्दल जास्त जागरूक व्हायला लागतो. आपण कोणत्या परिस्थितीत कसे वागतो याबद्दल आपण सजग व्हायला लागतो. थोडक्यात काय तर आपण जेव्हढा वेळ ध्यान करत असतो कींवा जसे संदीप महेश्वरी म्हणतात त्याप्रमाणे ज्यावेळी आपण आपले ध्यान स्वतःचे विचार, आपले आचरण यावर द्यायला लागतो त्यावेळी आपण स्वतःला आधीपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने ओळखायला लागतो.

असे नाहीये की ध्यान करण्याचे फक्त एवढेच फायदे आहेत अर्थात हे ही नसे थोडके. आज ध्यान अणि ध्यानाचा प्रभाव यावर अनेक जागतिक स्तरावर संशोधन चालु आहे त्यातुन आपल्याला ध्यान केल्याने आपल्या आयुष्यावर काय काय परीणाम होतो याबद्दल अधिकाधिक माहीती मिळत आहे. मी खाली थोडक्यात आणखी काही फायदे देत आहे.

6) ध्यानामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते परिणामी झोप पुर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी कमी होतो.

7) व्यसनमुक्ती साठी मदत करते.

8) रक्तदाब सुधरवायला मदत करते.

9) इच्छाशक्ती वाढायला मदत होते.

10) रागावर नियंत्रण मिळवता येते.

11) मानसिक आरोग्य सुधारते

12) वेगवेगळ्या स्थितीत शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते.

13) निरीक्षणशक्ती वाढते.

14) मन आनंदी, सकारात्मक उर्जेने भरलेले राहते. 

असे अनेक फायदे आहेत जे विज्ञानाने मान्य केले आहेत. तुम्ही इंटरनेट वर शोधल्यास लोकांचे अनुभव, वैज्ञानिक संशोधन याबद्दल माहिती मिळेल पण नुसत्या माहिती गोळा करण्याने आपल्याला काही फायदा होणार नाही. त्यापेक्षा दोन तीन महिने सलग रोज स्वतःसाठी आणि ध्यानासाठी आपल्या दिवसातील अर्धा तास काढून ध्यान करण्याचा सराव करून पहा आपल्याला नक्कीच फायदा होईल.

मी माझ्या ध्यान प्रवासाबद्दल व्यक्त मन - भाग 2 ध्यान  या पोस्ट मध्ये सांगितले आहे ती पोस्ट देखील वाचायला विसरू नका.

तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली हे सांगा कींवा नका सांगू पण कीमान दोन महिने रोज अर्धाच तास ध्यान करण्यासाठी नक्कीच द्या... 

टिप्पण्या