मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ध्यान आणि ध्यानाची पूर्वतयारी

तुम्ही जर ध्यान कसे करावे या प्रश्नाचे उत्तर शोधत आहात तर तुम्ही योग्य जागी आहात. आपण आजच्या पोस्ट मध्ये ध्यान किंवा meditation याच विषयावर चर्चा करणार आहेत. ध्यान धारणेची परंपरा प्राचीन काळापासून भारतात आहे, आपल्याला अनेक ध्यानी ऋषी मुनींचे वर्णन आपल्या रामायण, महाभारत व ईतर साहित्यात मिळते. योग आणि ध्यान वेगवेगळे आहेत का? पतंजली योग सुत्रांमध्ये अष्टांग योगाचे वर्णन आपल्याला मिळते. अष्टांग म्हणजे आठ अंग किंवा आठ भाग ते पुढिल प्रमाणे :- यम, नियम, प्रत्याहार, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान आणि समाधी. याचाच अर्थ असा की योग ह्या प्रक्रिया मधल्या ध्यान हा एक भाग आहे.  आज आपण प्रामुख्याने धारणा आणि ध्यान यावर चर्चा करणार आहे. धारणा म्हणजे काय?  जसे मी माझ्या मागील ध्यानाचे फायदे या ब्लाॅगमध्ये बोललो होतो एखादी गोष्टं किंवा घटना आपण आपल्या मनात किती वेळ धरून ठेऊ शकतो ही क्षमता म्हणजे आपली धारणाशक्ती. पुस्तकी भाषेत सांगायचं झालं तर एक उदाहरण घेऊन आपल्याला धारणा, ध्यान आणि समाधी समजुन घेता येईल. समजा तुम्ही एखाद्या देवाच्या प्रतिमेचे ध्यान करत आहात तर डोळे मिटून तुम्ही त्या प्रतिमेची स्पष्ट कल्