मुख्य सामग्रीवर वगळा

ध्यानाचे प्रकार - मंत्र ध्यान

ध्यान करण्यासाठी जी मनाची पुर्वतयारी करावी लागेल त्या बद्दल आपण आपल्या मागिल मागात पाहिले. आज आपण ध्यान करण्याच्या अनेक पध्दतिपैकी एक पध्दत म्हणजेच मंत्र ध्यान (Mantra Meditation) काय आहे व ते कसे करायचे याबद्दल माहिती करून घेणार घेणार आहोत... तर चला मग करूया सुरवात..



मंत्र म्हणजे काय? 
मनाची तुलना अनेक ऋषि मुनिंनी माकडासोबत केली आहे जे कधिही शांत बसत नाही त्याच मनाला शांत करण्यासाठी ध्यान केले जाते, अर्थात त्याचे अनेक आध्यात्मिक पैलू देखील आहेत, पण त्यावर अत्ता चर्चा नको.. 
मंत्र हा शब्द मं=मन + त्र = रक्षण करणारा असा आहे म्हणजेच असे म्हटले तर हरकत नाही की मनाचे रक्षण करण्यासाठी वापरलेला शब्द, वाक्य कींवा ध्वनी म्हणजे मंत्र.

मंत्राची निवड 
आता मंत्र ध्यान करायला एखादा मंत्र तर हवा. तर तो कसा निवडणार? तर आपण कोणता मंत्र वापरावा? भारतिय परंपरेत अनेक पवित्र मंत्र आहेत उदाहरण द्यायचे झाले तर गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र आणि आणखी खुप सारे पण आपल्याला मोठ्या मंत्राच्या ऐवजी लहान म्हणजे बीजमंत्राचा वापर करणे जास्त सोयीचे होईल, जसे की ॐ नमः शिवाय, ॐ नमो दत्ताय कींवा हरी ॐ नमो नारायणाय कींवा हरे राम हरे राम राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे.... हे फक्त उदाहरण म्हणून मी दीले आहे निवड ज्याची त्यानी केली तर उत्तम..
मंत्र निवडताना जो काही निवडाल शक्यतो तो असा निवडा ज्यावर तुमची श्रद्धा आहे, कोणला दाखवण्यासाठी एखादा मंत्र निवडू नका. नाहीतर सरळ सरळ ॐ चा वापर करा, असे म्हणले जाते की ॐ हा ध्वनी ब्रम्हांडाचा ध्वनी (universal) आहे... आणखी असेही म्हणतात की ॐ (अ ऊ म) हे तीन प्रमुख ध्वनी आहेत जसे रंगात लाल, हिरवा आणि निळा (RGB) असतो त्याप्रमाणे... असो..

मंत्र ध्यान कसे करावे?
शांत ठिकाणी कंबर, पाठ आणि मान सहजपणे सरळ राहील असे बसा (खुर्चीवर बसू शकता)...
३ ते ५ दिर्घ श्वास घ्या 
डोळे अलगदपणे मिटून घ्या
आता मंत्रोच्चार सुरू करा, आपण कितीवेळा मंत्रोच्चार करतो याला महत्व नाहीये तर आपण कीती लक्ष देऊन मंत्रोच्चार करत आहोत हे जास्त महत्वाचे आहे... 
असे भरपूर वेळा होईल की आपण मंत्रोच्चार करत आहोत पण, आपल्या मनात दुसरेच काहीतरी चालू आहे. अशावेळी चिडचिड करण्याची गरज नाहीये फक्त ज्यावेळी आपल्या लक्षात येईल की आपण ध्यान करायला बसलेलो आहोत त्यावेळी परत मंत्रावर लक्ष केंद्रीत करून ध्यान सुरू ठेवा, कारण मन भटकणे सामान्य आहे त्यात चिडचिड करण्याच गरज नाही. 

रोज कीमान २०-२५ मिनिटे तरी ध्यानाचा सराव करावा... 

मंत्रोच्चार करण्याची पद्धत
आपण मंत्रोच्चार तीन प्रकारे करू शकतो 
१ आपल्या सामान्य आवाजात स्पष्टपणे ऐकु येईल असे 
२ पुटपुटत 
३ मनातल्या मनात....

 यापैकी आपण सुरवातीला २-३ महीने तरी फक्त पहिल्या प्रकारचा वापर करणार आहोत, कारण दुसर्‍या आणि तिसर्‍या पध्दतीने ध्यान करताना आपले लक्ष कधी विचलित झाले हे आपल्याला कळणारच नाही.... (मी ज्यावेळी मंत्र ध्यान करतो त्यावेळी पहीली पध्दतच वापरतो) 

शेवटी आपण कोणत्या कोणत्या पध्दतीने ध्यान करू याबद्दल फक्त माहिती गोळा करण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष अनुभव करून पाहुया.... 

आपले या पोस्ट बद्दलचे आणि आपल्याला ध्यान करून मिळालेले अनुभव comment मध्ये सांगायला विसरू नका.. 

टिप्पण्या