मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ध्यान म्हणजे काय?

भरपुर वेळ झाला तो माणूस तिथेच त्या टेकडीवर थांबलाय... काय करत असेल तो माणूस? मोकळ्या हवेला बसलेल्या तिन मित्रांपैकी एकाने समोरच्या टेकडीकडे बोट दाखवून विचारले.. तो नक्कीच त्याच्या एखाद्या जनावरांच्या शोधात असेल कारण त्या टेकडीवरून आजुबाजुचे भरपुर दूरपर्यंत दिसते... दुसर्‍याने उत्तर दिले.. पण तो किती वेळेपासून एकाच दिशेला तोंड करून उभा आहे.. त्यामुळे मला नाही वाटत तो तिथे जनावराचा शोध घेण्यासाठी गेला असेल कदाचित तो त्याच्या मागुन येणाऱ्या साथीदाराची वाट बघत असेल... तिसरा म्हणाला..  नाहि रे मला वाटते तो नक्कीच तिथे ध्यानधारणा करत असेल.. पहिला म्हणाला.  तिघांचेही एकमत काही होत नाही अस पाहून आपण त्यालाच जाऊन विचरूयात तसही आपण  खुप वेळचे बसलो आहोत त्या निमित्ताने आपली एक मस्त चक्कर होईल या विचाराने तिघे त्या टेकडीवर गेले, त्या तिघांनी टेकडीवर जाऊन तिथे थांबलेल्या माणसाला सगळे सविस्तर सांगितले आणि विचिरले की आम्ही तिघे कितीतरी वेळेपासून तुमचे निरीक्षण करत आहोत आम्हाला या गोष्टीची उत्सुकता लागली आहे की तुम्ही ईतक्या वेळेपासून या टेकडीवर थांबुन नक्की काय करत आहात? मी तर फक्त थांबलो आहे.. त्या