भरपुर वेळ झाला तो माणूस तिथेच त्या टेकडीवर थांबलाय... काय करत असेल तो माणूस? मोकळ्या हवेला बसलेल्या तिन मित्रांपैकी एकाने समोरच्या टेकडीकडे बोट दाखवून विचारले..
तो नक्कीच त्याच्या एखाद्या जनावरांच्या शोधात असेल कारण त्या टेकडीवरून आजुबाजुचे भरपुर दूरपर्यंत दिसते... दुसर्याने उत्तर दिले..
पण तो किती वेळेपासून एकाच दिशेला तोंड करून उभा आहे.. त्यामुळे मला नाही वाटत तो तिथे जनावराचा शोध घेण्यासाठी गेला असेल कदाचित तो त्याच्या मागुन येणाऱ्या साथीदाराची वाट बघत असेल... तिसरा म्हणाला..
नाहि रे मला वाटते तो नक्कीच तिथे ध्यानधारणा करत असेल.. पहिला म्हणाला.
तिघांचेही एकमत काही होत नाही अस पाहून आपण त्यालाच जाऊन विचरूयात तसही आपण
खुप वेळचे बसलो आहोत त्या निमित्ताने आपली एक मस्त चक्कर होईल या विचाराने तिघे त्या टेकडीवर गेले, त्या तिघांनी टेकडीवर जाऊन तिथे थांबलेल्या माणसाला सगळे सविस्तर सांगितले आणि विचिरले की आम्ही तिघे कितीतरी वेळेपासून तुमचे निरीक्षण करत आहोत आम्हाला या गोष्टीची उत्सुकता लागली आहे की तुम्ही ईतक्या वेळेपासून या टेकडीवर थांबुन नक्की काय करत आहात?
मी तर फक्त थांबलो आहे.. त्या व्यक्तिने उत्तर दिले
हो.. पण नक्की कशासाठी थांबले आहात? तिघांपैकी एकाने विचारले..
गरज आहे का काही कारण असलेच पाहिजे असे.... मी फक्त थांबलो आहे... ना मी कोणाची वाट पाहतोय.. ना मी काही ध्यान व्यान करतोय.. ना माझ जनावर शोधतोय.... मी फक्त ईथे थांबलोय...
Being in Present moment म्हणजे काय? कींवा ध्यान म्हणजे काय? हे या छोट्याशा गोष्टींवरून कळते... आपण काहीही करो पण आपल्या मनात काही ना काही चालू असते... आपण कामावर असतो पण आपले मन सकाळी घडलेल्या घटनांबद्दल कींवा आज आपल्याला आणखी काय काय करायचे आहे याचा विचार करत असते.... आपण विचार करत राहतो हा आपल्यासाठी प्रॉब्लेम आहे का? तर नक्कीच नाही.. पण अनियंत्रित पणे, गरजेपेक्षा जास्त विचार करतो हा नक्कीच प्रॉब्लेम आहे.. आपण आपल्या मनात चाललेल्या विचारात इतके गढून जातो की कित्येकदा आपण आपल्या विचारांमध्येच जगायला चालू करतो त्यामुळे सहाजिकच आपले लक्ष लागत नाही.... थोडक्यात काय तर वर्तमानात पुर्णपणे जगण्यालाच आपण ध्यान म्हणू शकतो...
आता प्रश्न पडतो की काय आपण भूतकाळाबद्दल विचार करतो कींवा भविष्याबद्दल जो विचार करतो ते चुकीचे आहे का? तर याचे उत्तर आहे नाही आपण भूतकाळाबद्दल विचार करून त्या अनुषंगाने आपले मत, आपली प्रतिक्रिया ठरवत असतो आणि भविष्याचा विचार करून आपण नियोजन वगैरे करतो हा आपला प्रॉब्लेम नाहीये पण ज्यावेळी आपल्या भूतकाळाचे अनुभव किंवा भविष्यात काय होईल याची चिंता आपल्यावर हावी होते आणि आपल्याला विनाकारणच त्याचा त्रास होत राहतो हे नक्कीच चुकीचे आहे.... ध्यान केल्याचा हा एक चांगला फायदा होतो की आपण वर्तमानात जगायला लागतो असे वाटते पण असे नसून वर्तमानात जगणे म्हणजेच ध्यान करणे आहे आणि त्यामुळे आपल्यावर भूतकाळाचे किंवा भविष्याबद्दलचे विचार आपल्यावर हावी होत नाही हे दोन मुख्य फायदे आहेत.
ध्यान म्हणजे काय? (what is meditation?)वर्तमानात जगने म्हणजे ध्यान यालाच Mindfulness सुध्दा म्हणतात.
मी माझ्या ध्यान प्रवासाबद्दल व्यक्त मन - भाग 2 ध्यान या पोस्ट मध्ये सांगितले आहे ती पोस्ट देखील वाचायला विसरू नका.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली हे सांगा कींवा नका सांगू पण कीमान दोन महिने रोज अर्धाच तास किंवा किमान 15 20 मिनिटे ध्यान करण्यासाठी देऊन ध्यान करण्याच्या फायद्यांचा अनुभव नक्कीच घ्या...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा