मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ध्यानाचे प्रकार - विचार ध्यान

चीन मध्ये एकदा एक माणसाने एका भिक्षुकडे हट्ट धरला... महाराज मला एखादा मंत्र द्या ज्याला मी सिध्द करू शकेल आणि ज्या मंत्राच्या सिध्द केल्याने मला लाभ होईल.. भिक्षुने नकार दिला पण तो माणुस काही ऐकायला तयारच नव्हता, सकाळची संध्याकाळ झाली पण तो माणूस काही भिक्षुचा पिच्छा सोडत नाही असे बघुन त्याला एक मंत्र सांगितला आणि सागितले की या मंत्राचा पुढच्या पंधरा दिवसांच्या आत सलग सात दिवस ठराविक वेळा जप करावा लागेल तरच हा मंत्र सिद्ध होईल, जर पुढच्या पंधरा दिवसात तु हा मंत्र सिद्ध नाही केला तर हा मंत्र काही कामाचा राहणार नाही. मंत्र घेऊन तो माणूस आनंदाने घरी चाललाच होता की तेव्हढ्यात त्या भिक्षुने त्याला मागुन आवाज दिला. एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिलि. भिक्षु म्हणाले. या मंत्राचा माकड खुप मोठा दुश्मन आहे जर मंत्र जपाच्या सात दिवसांत एकदा जरी तुझ्या मनात माकडाचा विचार आला तर तुला दुसर्‍या दिवशी पुन्हा सुरवात करावी लागेल, त्यामुळे काहीही झाल तरी एक लक्षात ठेव, तुझ्या मनात माकडाचा विचार नाही आला पाहिजे याची काळजी घे. भिक्षुने चेतावणी वजा सूचना दिली. हो, तसाही कोणाच मन माकडाचा विचार करतं पण तरीही त

ध्यानाचे प्रकार - आनापान

मला ध्यानधारणा करण्यासाठी सगळ्यात सोपी आणि आनंददायी वाटणारी पध्दत... आनापान ही ध्यान सुमारे २६०० वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्धांनी शिकवली.... ध्यान नेमक कशावर किंवा कशाच करायचे?  ध्यानाला सुरवात करण्या अगोदर आपल्याला आलंबन निवडावे लागेल. आता आलंबन म्हणजे काय? तर आपल्याला एखादी अशी गोष्ट ज्यावर आपल्याला मन केंद्रित करायचे आहे. उदा. तुम्ही मंत्र ध्यान करत असाल तर तुम्ही जो काही मंत्र निवडला आहे तो मंत्र म्हणजे तुमचे आलंबन. आपण आनापान संदर्भात बोलायचे तर आपला येणारा जाणारा श्वास आपले आलंबन निवडणार आहोत.  मंत्र ध्यान कसे करायचे? आनापान ध्यान म्हणजे काय? आन = येणारा श्वास अपान = जाणारा श्वास थोडक्यात येणार्‍या जाणार्‍या श्वासावर लक्ष देणे म्हणजे आनापान ध्यान. आनापान ध्यान कसे करायचे? १) आरामदायक स्थितीमध्ये पण कंबर, पाठ आणि मान सरळ राहील असे बसने. (हव तर मांडी घालून किंवा खुर्चीवर दोन्हीपैकी जे सुखकर होईल असे बसने) २) अलगदपणे डोळे बंद करने ३) येणाऱ्या - जाणाऱ्या प्रत्येक श्वासावर लक्ष केंद्रीत करने. कोणतेही ध्यान करताना एक गोष्ट सारखी होत राहते आणि ती म्हणजे लक्ष भटकणे उदा. तुम्ही एका शांत