मुख्य सामग्रीवर वगळा

मौन म्हणजे काय?

एखादा व्यक्ती जर बोलत नसला तरी गरजेचे नाही की तो व्यक्ती मौन आहे. कदाचित तो खुप बडबड करत असेल, जोरा जोरात ओरडत असेल पण मनातल्या मनात, फक्त तो मनात बोलत असल्यामुळे पल्याला ऐकू येत नाहीये पण याचा अर्थ तो व्यक्ती मौन आहे असा होत नाही.

मौन म्हणजे काय? 
ढोबळपणे मौन राहण्याचे तीन प्रकार करू शकतो.

बाह्य मौन :- न बोलने किंवा गप्प राहणे. तोंडाने न बोलणे, पण मनात विचार चालू आहेत, कोणी काही विचारलं तर इशारा करून उत्तर देणे या प्रकारच्या मौन धारण करणे या प्रकारात येते.

अंतर्गत मौन :- मनातले विनाकारण चाललेल्या विचारांचे शांत होणे या प्रकरच्या मौनात येते. या प्रकारचे मौन साध्य करण्यासाठी बाह्य मौन धारण केले जाते.

आर्य मौन :- ज्यावेळी मी विपश्यना करायला गेलो होतो त्यावेळी मला या प्रकारच्या मौन धारण करण्या बद्दल कळाले होते. हा मौन धारण करण्याचा सर्वोत्तम प्रकार आहे असे म्हटले तरी त्यात काही गैर नाही. या काया, वाचा आणि मन या तिन्ही प्रकारचे मौन पाळले जाते. म्हणजे ना मनात काही बोलायचे, ना इशारा करून काही संवाद साधायचा आणि ना तोंडाने काही बोलायचे.



मौन धारण करण्याचे फायदे (Benifits of silence) - 
१ मन शांत होते व मनाची शक्ती वाढते. 
२ रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत मिळते. 
३ विचार शक्ति वाढते. 
३ मौन धारण करण्याने ध्यान करायला मदत मिळते. 

मौन धारण केल्याने मन शांत होते याचा अर्थ असा नाही की तुम्ही मौन धारण केले आणि लगेच तुमचे 
मन शांत झाले, पण जितका तुम्ही मौन आणि ध्यान धारणेचा सराव कराल तितका तुम्हाला फरक जाणवला लागेल. ध्यान करायला सुरुवात करण्या अगोदर काही वेळ जर तुम्ही मौन धारण केले तर तुमच्या असे लक्षात येईल की आधीपेक्षा आपले ध्यान आता जास्त चागले होत आहे..

ध्यान करण्याचे फायदे काय आहेत हे जाणून घ्या. 

 आजची पोस्ट कशी वाटली हे सांगा कींवा नका सांगू पण कीमान दोन महिने रोज अर्धाच तास किंवा किमान 15 20 मिनिटे ध्यान करण्यासाठी आणि मौन धारण करण्यासाठी देऊन ध्यान करण्याच्या फायद्यांचा अनुभव नक्कीच घ्या... 

टिप्पण्या