मुख्य सामग्रीवर वगळा

About us !

नमस्कार मित्रांनो shabdsaundarya.blogspot.com या ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत..!

मित्रांनो... ज्या अर्थी तुम्ही हे पेज वाचत आहात त्या अर्थी तुम्ही आपल्या या ब्लॉगवर असणार्‍या काही पोस्ट नक्कीच वाचल्या आहेत, काय... बरोबर ना.? तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की मी वर माझा ब्लॉग म्हणण्याऐवजी आपला ब्लॉग का म्हणालो? तर या प्रश्नाचे सरळ उत्तर आहे की तुम्हा वाचक वर्गा शिवाय या ब्लॉग वर असणाऱ्या कुठल्याही पोस्टला काहीही अर्थ नाही. आणि मुख्य म्हणजे मी सुध्दा एक सामान्य वाचकच आहे.सगळ्यात आधी मी माझी ओळख करून देतो. माझ नाव प्रशांत साखरे आहे आणि मी पुण्यात राहतो. खर सांगायच झाले तर मला काही तरी लिहिण्या पेक्षा वाचायला जास्त आवडत हेच कारण आहे की शब्द सौंदर्य या ब्लॉगवर असणार्‍या पोस्ट मधे एखाद्या विषयावर माहिती देण्यासोबत मी सदैव वाचकाची व माझीही त्या विषयाबद्दल उत्सुकता वाढावी असा प्रयत्न सुध्दा करतो. त्यामुळे कदाचित तुम्हाला या ब्लॉगवर असणार्‍या पोस्ट इतर ब्लॉग पेक्षा थोड्याशा वेगळ्या वाटण्याची शक्यता आहे.
हा ब्लॉग जितका इतरांना माहिती देण्यासाठी आहे तितकाच माझे स्वतःचे मत व्यवस्थित मांडता यावे, विचार स्पष्ट व्हावे महत्वाचे म्हणजे लिहिण्याचा निमित्ताने वाचायला भेटावे हा सुध्दा हेतू आहे. 

धन्यवाद... 

टिप्पण्या